केळीच्या पानावर निवेदन

केळीच्या पानावर निवेदन
Published on: 
NSK26H31323 जळगाव : शिवसेना ठाकरे गटातर्फे केळीच्या पानावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन देताना खान्देश केळी उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे पदाधिकारी. ------- शेतकरी संघर्ष समितीचे केळीच्या पानावर निवेदन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ४ : पिकांचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची तत्काळ मदत करावी, अशी मागणी आज खान्देश केळी उत्पादक शेतकरी संघर्ष समितीतर्फे करण्यात आली. यावेळी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना ‘केळी’च्या पानावर मागण्यांचे निवेदन देण्यात आले. राज्यात दुष्काळ घोषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना तातडीने मदत मिळावी. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी, शेतमजूर आणि नागरिक बिकट परिस्थितीतून जात आहेत. पिके करपून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले असून पिण्याच्या पाण्याची व गुरांच्या चाऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. कापसाला १२ हजार रुपये पर्यंत भाव मिळावा, आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शिवराम पाटील यांच्या तक्रारी प्रहार जनशक्ती पक्षाचे शिवराम पाटील यांनी तीन विविध विभागांच्या तक्रारी केल्या आहेत. त्यात जळगाव भूमी अभिलेख विभागाकडे दोन, तीन वर्षांपासून शेतजमीन मोजण्यास दिली आहे. अजूनपर्यंत ती जमीन मोजून दिली गेली नाही. या विभागास वेळेची मर्यादा पाळण्यास सांगावे. सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त लिपिकाच्या मुलास रस्त्याची कामे नियमबाह्य पद्धतीने दिली आहेत, त्याची चौकशी व्हावी, नियोजन समितीतून शासकीय कार्यालयाचे नूतनीकरण, सुशााेभीकरणाला निधी न देता दुष्काळासाठी तो वापरावा, आदी तक्रारींचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com