बंद पथदिव्यांचा फायदा; रस्त्यांवर मद्यपींचा गोंधळ

बंद पथदिव्यांचा फायदा; रस्त्यांवर मद्यपींचा गोंधळ
Published on: 
NSK26H34137 जळगाव : किसनराव नगरात वाहने अशी अंधारात उभी करून मद्यपींचा सर्रास वावर असतो. ........ बंद पथदीपांचा फायदा; रस्त्यांवर मद्यपींचा धुडगूस किसनराव नगरातील शंभरफुटी, गिरणा पंपिंग रोडवरही रात्री गोंधळ सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३१ : शहरातील बंद पथदीपांमुळे रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरले असून, याच अंधाराचा फायदा मद्यपींकडून घेतला जात आहे. रामानंदनगर घाटाखालील किसनराव नगरातील शंभरफुटी रस्त्यावर अनेक महिन्यांपासून पथदीप बंद आहेत. त्यामुळे या रस्त्यावर रात्रीच्या वेळी रिक्षा आणि चारचाकी वाहनांमध्ये मद्यपान करणाऱ्यांचा खुलेआम वावर वाढला आहे. मद्यपींमधील वाद आणि हाणामाऱ्यांमुळे परिसरातील नागरिकांसह रात्री फिरायला जाणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किसनराव नगरातील शंभरफुटी रस्त्यावर अनेक पथदीप बंद असल्याने रात्रीच्या वेळी संपूर्ण परिसर अंधारात बुडतो. या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही जण रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रिक्षा आणि चारचाकी वाहनांमध्ये मद्यपान करतात. मद्याच्या नशेत त्यांच्यात अनेकदा वाद होऊन हाणामारीचे प्रकारही घडतात. त्यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांना भीतीच्या वातावरणात मार्ग काढावा लागत आहे. रस्त्यावरही मद्यपींचा उपद्रव दुसरीकडे, वाघनगरपुढील गिरणा पंपिंगकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरही अशीच परिस्थिती आहे. जिजाऊ नगरच्या अलीकडे रस्त्यालगत असलेल्या एका टपरीवर दारूची विक्री होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी मद्यपींचा गोंधळ सुरू असतो. त्यामुळे या रस्त्यावरून शतपावलीसाठी जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. चौकट मनपा, पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी एकीकडे शहरात पथदीप बंद असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे सार्वजनिक रस्त्यांवर मद्यपान आणि मद्यविक्रीमुळे उपद्रव वाढत आहे. महापालिकेने किसनराव नगरातील बंद पथदीप तातडीने सुरू करावेत. तसेच पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर आणि अवैध मद्यविक्रीच्या तक्रारींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.