घनकचरा प्रकल्पाचे काम रखडल्यास कचरा येऊ देणार नाही

घनकचरा प्रकल्पाचे काम रखडल्यास कचरा येऊ देणार नाही
Published on: 
टुडे ४, मेन फिचर NSK26H34935 जळगाव : घनकचरा प्रकल्प कामाची पाहणी करताना उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, उपायुक्त निर्मला गायकवाड आदी महापालिकेचे अधिकारी व मक्तेदार. .......... घनकचरा प्रकल्प रखडल्यास कचरा टाकू देणार नाही उपमहापौर, स्थायी सभापतींचा ठेकेदाराला इशारा; कामाची मुदत लेखी देण्याचे आदेश सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : शहरातील कचऱ्याचा प्रश्न आणि घनकचरा प्रकल्प येथील वाढत्या धुराच्या समस्येवरून महापालिका पदाधिकाऱ्यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. या कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे काम निर्धारित मुदतीत पूर्ण न झाल्यास या ठिकाणी शहराचा कचरा येऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा उपमहापौर मनोज चौधरी आणि स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील यांनी ठेकेदाराला दिला. प्रकल्पाच्या कामाची पाहणी करून त्यांनी प्रगतीचा आढावा घेतला आणि काम वेळेत पूर्ण करण्याचे लेखी हमीपत्र देण्याचे आदेश दिले. पंधरा दिवसांपूर्वी या कचरा प्रकल्पाची आयुक्त, महापौर यांनी पाहणी केली होती. यावेळी उपमहापौर चौधरी व स्थायी सभापती डॉ. पाटील यांनी कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या संथ कामाबाबत संताप व्यक्त केला होता. शुक्रवारी (ता.१३) या घनकचरा प्रकल्पाची उपमहापौर, सभापती तसेच अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर, आरोग्य उपायुक्त निर्मला गायकवाड, आरोग्य विभागप्रमुख समीर बोरोले, प्रकल्पप्रमुख अभियंता योगेश वाणी तसेच रॉयल वेस्टर्नचे प्रतिनिधी राऊत आणि श्री श्री इन्फ्रास्ट्रक्चरचे साइट इंजिनिअर पाहणी दरम्यान उपस्थित होते. कामाला काहीअंशी गती ३० ऑक्टोबरच्या पाहणीनंतर कामाच्या प्रगतीत काहीशी गती दिसून आली आहे. सध्या कचरा वाहतुकीसाठीच्या रॅम्पचे सुमारे ८० टक्के, तर प्रोसेसिंग प्लांटचे ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. रॅम्पचे उर्वरित काम महिनाभरात पूर्ण करण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले. प्लांटचे फॅब्रिकेशन तयार असून काँक्रिटीकरणाचा बेस आणि पिलरचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील तीन ते चार महिन्यांत उभारणी पूर्ण करण्याचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले. कामाचा लेखी आढावा द्या यावेळी उपमहापौर चौधरी यांनी महापालिका प्रशासन तसेच मक्तेदार यांच्या संथ कामावर नाराजी व्यक्त करत केवळ आश्वासनांवर न थांबता कामाची निश्चित मुदत लेखी स्वरूपात द्यावी, अशी भूमिका घेतली. शहरातील संपूर्ण कचरा आपल्या प्रभागात आणला जात असताना प्रकल्पाचे काम अनिश्चित काळासाठी रखडू देणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. चौकट अग्निशमन बंब कायमस्वरुपी ठेवा दरम्यान, डम्पिंग ग्राउंडवरील वारंवारच्या आगी आणि धुरामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. दिवाळीसारख्या सणातही धुरामुळे घराबाहेर पडणे कठीण झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. दमा, त्वचाविकारांसह कर्करोगासारख्या गंभीर आजारांची भीती व्यक्त होत असल्याने या समस्येकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी करण्यात आली. आग आणि धुरावर नियंत्रणासाठी डम्पिंग ग्राउंडवर २४ तास अग्निशमन दलाचा बंब तैनात ठेवण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्तांना देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.