ॲंकर
NSK26H33059
जळगाव : महापालिकेच्या टीबी रुग्णालय येथील कचरा हस्तांतरण केंद्रातील रॅम्पच्या चाचपणीप्रसंगी पाहणी करताना आयुक्त आदित्य जिवने. सोबत अन्य अधिकारी व मक्तेदार.
......
कचरा हस्तांतरण केंद्राची आयुक्तांकडून चाचपणी
टीबी रुग्णालयालाही भेट; रॅम्पसह तांत्रिक बाबी तपासून मक्तेदाराला सूचना
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १९ : शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक कार्यक्षम करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कचरा स्थलांतर केंद्राच्या कामाची महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांनी सोमवारी सकाळी पाहणी केली. टीबी रुग्णालय परिसरातील महापालिकेच्या जागेवर नव्याने तयार करण्यात आलेल्या या केंद्रातील बांधकाम, रॅम्प आणि अन्य तांत्रिक बाबींची त्यांनी तपासणी केली.
शहरातून घंटागाड्यांद्वारे संकलित होणारा कचरा मोठ्या वाहनांमध्ये हस्तांतरित करण्यासाठी या केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. आयुक्तांनी प्रत्यक्ष कामकाजाची चाचणी घेत घंटागाडीतून आणलेला कचरा रॅम्पच्या साहाय्याने मोठ्या कचरा वाहतुकीच्या वाहनात टाकण्याच्या प्रक्रियेची पाहणी केली. या वेळी रॅम्पची रचना, बांधकामाची स्थिती आणि कचरा हस्तांतरणासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक बाबींची तपासणी करण्यात आली. पाहणीदरम्यान बांधकामातील काही त्रुटी लक्षात आल्यानंतर त्या दुरुस्त करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या.
घनकचरा प्रकल्पाची पाहणी
यानंतर आयुक्तांनी निमखेडी परिसरातील महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पालाही भेट दिली. येथे संकलित कचरा घेऊन येणाऱ्या वाहनांचे वजन करण्यासाठी उभारण्यात आलेल्या वजनकाट्याची पाहणी करण्यात आली. या पाहणीमुळे कचरा स्थलांतर केंद्र आणि घनकचरा प्रकल्पातील कामांची गुणवत्ता, तांत्रिक अचूकता आणि कार्यक्षमतेवर प्रशासनाचा भर असल्याचे स्पष्ट झाले.
चौकट
उपमहापौरांचे आयुक्तांना पत्र
महामार्गावरील शासकीय आयटीआयजवळील कचरा संकलन रॅम्प हा नवीन टीबी रुग्णालयाच्या जागेवरील तयार झालेला रॅम्पवर येत्या दोन ते तीन दिवसात स्थळांतरीत करावे, याबाबतचे उपमहापौर मनोज चौधरी यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे.