पाण्याची नासाडी आता पडणार महागात

पाण्याची नासाडी आता पडणार महागात
Published on: 
सेकंड मेन NSK26H31556 जळगाव : शनिपेठ येथील काट्या फाइल परिसरात अमृत जलवाहिनीच्या नळाला तोटी नसल्याने नालीत वाहणारे पाणी. .......... पाण्याची नासाडी करणे पडणार महागात आता दंडात्मक कारवाई; दुष्काळी स्थितीत महापालिकेचा कडक पवित्रा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने आगामी काळातील पाणीपुरवठ्याचे आव्हान लक्षात घेऊन महापालिकेने पाणीवापराबाबत कठोर भूमिका घेतली आहे. उपलब्ध पाणीसाठा जपून वापरण्यासाठी शहरातील पाणीपुरवठ्याचे नव्याने नियोजन करण्यात येणार असून, पाण्याची नासाडी करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. घरगुती तसेच व्यावसायिक नळांना तोट्या नसतील किंवा नळ उघडा ठेवून पाणी वाहू दिल्याचे आढळल्यास दोन दिवसांनंतर कारवाई सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महापौर दीपमाला काळे यांनी मंगळवारी पाणीपुरवठा विभागाची बैठक घेऊन शहराच्या पाणीस्थितीचा आढावा घेतला. यावेळी विभागप्रमुख घृष्णेश्वर साळुंखे यांच्यासह संबंधित अधिकारी व अभियंते उपस्थित होते. शहरातील काही भागांत निर्धारित वेळेपेक्षा अधिक काळ पाणीपुरवठा होत असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याच्या तक्रारी बैठकीत समोर आल्या. त्यामुळे प्रत्येक भागातील पाणीपुरवठ्याचा प्रत्यक्ष आढावा घेऊन सर्व ठिकाणी पाणीपुरवठ्याची वेळ निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले. दरम्यान, मागील काळात वाघूर धरणातील पाणीसाठा योग्य पद्धतीने राखण्यात आल्याने सध्याच्या परिस्थितीत शहराला त्याचा फायदा होत आहे. उपलब्ध साठा पुढील जूनपर्यंत पुरविण्याचे नियोजन असले, तरी त्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करणे गरजेचे असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. पाण्याची नासाडी रोखा शहरात अनेक ठिकाणी नळांना तोट्या बसवलेल्या दिसून येत नाही. त्यामुळे ज्या भागात पाणीपुरवठा होतो तेथे पाण्याची मोठी नासाडी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे महापौरांनी पाण्याची नासाडी करणार्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहे. मनपाकडे फोटो पाठवा पाण्याची नासाडी होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी छायाचित्रांसह महापालिकेकडे माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या नागरिकाची ओळख गोपनीय ठेवली जाणार आहे. कोट दुष्काळी परिस्थितीत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनीही जबाबदारीने पाणी वापरावे. पाण्याचा प्रत्येक थेंब जपल्यास उपलब्ध साठा अधिक काळ टिकविता येईल. - दीपमाला काळे, महापौर, महापालिका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com