Jal jeevan Mission : ॲपवर फोटो अपलोड न केल्याने प्रशासनाने रोखली जलजीवनची देयके

Jal Jeevan Mission
Jal Jeevan Missionesakal

Jal jeevan Payment : जलजीवन मिशन अंतर्गत असलेल्या योजनेची कामे वेळात व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने जलजीवन मिशन वर्क क्वालिटी मॉनिटरिंग प्रणाली विकसित केली. या संगणक, मोबाईल प्रणालीवर झालेल्या कामांचे फोटो अपलोड करणे अपेक्षित आहे.

मात्र, कामांची देयके काढताना हे फोटो अपलोड न केल्याने कोट्यवधींची देयके प्रशासनाने रोखली आहेत. त्यामुळे हातोहात देयके काढणाऱ्या ठेकेदारांना दणका दिला आहे. (Jaljeevan payments stopped by administration for not uploading photos on app nashik news)

जलजीवन मिशन अंतर्गत १२२२ कामे सुरू असून घाई -घाईत चुकीचे काम होऊ नये, तसेच कामात कोणी ठेकेदाराने दिरंगाई किंवा वेळकाढूपणा करून दुय्यम दर्जाचे काम होण्याचा धोका असतो.

यासाठी मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या सूचनेनुसार ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे जलजीवन मिशन वर्क क्वालिटी मॉनिटरिंग मोबाईल तथा संगणक अॅप तयार करण्यात आले आहे.

या अॅपसाठी कार्यकारी अभियंता आणि शाखा अभियंता, उपअभियंता यांना तपासणीसाठी लॉगिन देण्यात आले आहेत. कनिष्ठ अभियंता आणि योजनेसाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदार यांना या प्रणालीमध्ये संबंधित पाणीपुरवठा योजनेचे व्हिडिओ, फोटो तारखेनुसार अपलोड करावी, अशी सूचना मित्तल यांनी दिल्या होत्या.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Jal Jeevan Mission
MHT-CET Exam: एमएचटी -सीईटीला 97 टक्‍के हजेरी; पहिल्‍या दिवशी उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद, गणित-भौतिकशास्‍त्र अवघड

तसेच कामांची देयके सादर झाल्यानंतर संबंधित ठेकेदाराने फोटो अपलोड करणे बंधनकारक केले होते. परंतु, ठेकेदारांकडून फोटो अपलोड न करता थेट देयके सादर झाली. कामांची सद्यःस्थिती नेमकी काय आहे, काम किती पूर्ण झाले, अपूर्ण आहे हे देयके देताना लक्षात यावे यासाठी हे अॅप तयार केले असून त्यावर फोटो अपलोड करणे ठेकेदारांकडून अपेक्षित आहे.

परंतु, ठेकेदारांकडून फोटो अपलोड न करता थेट देयके काढण्याची घाई सुरू आहे. परंतु, देयकांच्या या फाईली रोखत प्रशासनाने ठेकेदारांना चांगलीच चपराक लावली आहे. काही कामांच्या तक्रारी आहेत, काही कामे पूर्ण नसताना देयके काढण्याचा घाट घातला जात आहे.

मात्र, प्रशासनाने ही देयके रोखत त्यावर, प्रशासनाने सादर झालेली सर्व देयके रोखत फोटो अपलोड करण्याची सक्ती केली आहे. साधारण १०० हून अधिक कामांच्या फाईली यामुळे पुन्हा पाठवत फोटो अपलोड करण्यास सांगितले आहे. यामुळे झालेल्या कामांचे योग्य मूल्यमापन होण्यास मदत होणार आहे.

Jal Jeevan Mission
Nashik: कनिष्ठ, सहाय्यक अधिकाऱ्यांची ZP CEOनी घेतली परिक्षा; कामात बदल करून चांगले काम करण्याचे सूचना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com