रिक्षाचालकाला पिस्तुल लावल्याचा प्रकार

रिक्षाचालकाला पिस्तुल लावल्याचा प्रकार
Published on: 
NSK26H35043 जळगाव : रिक्षाचालकासह शहर पोलिस ठाण्यात पाेहोचलेले ॲड. अनिकेत निकम व सहकारी. रिक्षाचालकाला पिस्तूल लावल्याचा प्रकार ॲड. अनिकेत निकम रिक्षाचालकासाठी पोलिस ठाण्यात दाखल सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १४ : शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुख्य रस्त्यावर कारचालकाने रिक्षाला मागून धडक दिली. रिक्षाचालकाने जाब विचारल्यावर कारचालकाने थेट शिवीगाळ करून रिक्षाचालकाच्या कानशिलात लगावली. इतक्यावरच वाद न थांबता संबंधित अधिकाऱ्याने थेट पिस्तूल काढून रिक्षाचालकाला धमकावल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. या प्रकरणात आता नवे वळल आले असून, पीडित रिक्षाचालकाच्या बाजूने विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचे पुत्र थेट पोलिस ठाण्यात धडकले. संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांच्यावतीने करण्यात आली. नेमके काय प्रकरण शहर पेालिस ठाण्याच्या हद्दीत वाहन पार्क करण्याच्या वादातून जिल्‍हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका शाखेत सहाय्यक आयुक्त जनार्दन पवार यांनी वाद घालत असल्याचे प्रकरण समोर आले. गुरुवारी (ता.५) रात्री आठला घडलेल्या या प्रकरणात रिक्षाचालकाला मारहाण करत त्याला पिस्तूल लावल्याचे रिक्षाचालकाचे म्हणणे आहे. घडल्या प्रकाराला तब्बल नऊ दिवस उलटूनही रिक्षाचालकाची तक्रार पोलिस नोंदवून घेत नव्हते. उलट त्याच्याच विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. चौकट अनिकेत निकम यांनी आव्हाडांची घेतली भेट घडल्या प्रकारणाचे सोशल मीडियातून पडसाद उमटत असताना विद्यमान खासदार आणि ख्यातनाम विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांचे पुत्र अनिकेत निकम या रिक्षाचालकाच्या बाजूने उभे राहिले असून गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी आज शहर पोलिस ठाण्यात धडकले. तेथे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड यांची भेट घेऊन संपूर्ण घटनेची माहिती दिली. तसेच रिक्षाचालकावर झालेल्या अन्यायाची गांभीर्याने दखल घेऊन त्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.