साईड स्टोरी
----
अवजड वाहतुकीमुळे महामार्गावर आठवा बळी
उपशीर्षक
बाह्यवळण मार्ग बंदच; शहरातील रस्ते धोकादायक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १५ : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील ताण कमी करण्यासाठी हजारो कोटी खर्चून पाळधी-तरसोद बाह्यवळण मार्ग (बायपास) बनविण्यात आला. मात्र, उद्घाटनानंतर पहिल्याच पावसात पुलासह काही भाग खचला. या मार्गाने वाहतूक धोकेदायक म्हणून शहरातून वळविण्याचे फर्मान जिल्हा प्रशासनाने काढले. शहरातून वळविलेल्या याच अवजड वाहतुकीने आजवर आठ कर्तबगार तरुणांचा बळी घेतला असून आणखी किती बळी घेणार? असा सवाल जनसामान्यांतून विचारण्यात येत आहे.
पाळधी-तरसोद बायपासची वाहतूक शहरातून वळविल्यानंतर जळगाव शहरातील महामार्गांवरील वाहतुकीचा ताण आणि प्राणांतिक अपघातांची संख्या वाढली आहे. कालिंकामाता मंदिर, अजिंठा चौक, ईच्छादेवी चौक, आकाशवाणी, उड्डाणपुल, आयटीआय, शिवकॉलनी, मानराज पार्क, खोटेनगर सह बांभोरी पुलापर्यंत दररोज अपघात घडत आहेत. या अपघातात मृत्युमुखी पडणारे कुठल्या तरी कुटुंबाचा आधार, उच्चशिक्षण घेणार विद्यार्थी, कुटुंबाचा कर्ता पुरुषाचा समावेश असतो.
१४-२
उड्डाणपुलाची दुरुस्ती थंड
बायपासवरील वाहतूक बंद होऊन अडीच महिने उलटले. त्यामुळे महामार्गावरुन ये- जा करणाऱ्या शहरातील नागरिकांना तोवर जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतोय. एकीकडे बायपासच्या दुरुस्तीला चार महिन्यांचा अवधी अपेक्षित आहे. दुसरीकडे शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी समांतर रस्त्यांचे काम सुरु आहे. यामुळे दुचाकीस्वार, शाळकरी मुलांची वाहतूक करणारे वाहन धारक कमालीचे मेटाकुटीस आले आहेत.
---------
अपघात, वाहतुकीचे ऑडीट व्हावे
एकूणच तरसोद फाट्यापासून शहरात शिरणाऱ्या अवजड वाहतुकीच्या महामार्गावर आलेला ताण, अपघातामुळे वाहनांच्या वेगावर नियंत्रण, अवजड वाहनांच्या वाहतुकीचे नियोजन आणि अपघातप्रवण ठिकाणी पोलिस,महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने जातीने लक्ष पुरवून यावर तोडगा काढावा, अशी परिस्थीती आता निर्माण झाली आहे.
------
असे अपघात, असे मृत्यू
१ ऑगस्ट : वाहनाच्या धडकेत जखमी सुरक्षारक्षकांचा मृत्यू (कालिंका माता चौक)
५ ऑगस्ट : टँकरने दुचाकीला धडक देऊन चिरडल्याने मंगला अर्जुन माळी (५५, रा. ज्ञानदेव नगर) या महिलेचा मृत्यू, त्यांचा मुलगा भरत माळी (२९) जखमी झाला होता.
८ ऑगस्ट : नशिराबाद येथील अश्रफ मोमिन (वय-३५) खचलेल्या बायपासवर दुचाकीसह खाली पडून जागीच ठार
२० ऑगस्ट : वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे योगेश उर्फ युवराज कडू महाजन (रा. ३८, रा. इच्छादेवी चौक) ठार झाले. (बांभोरी पुलाजवळ)
२० ऑगस्ट : वाहनाने दुचाकीला धडकेत हेमंत डहाळे या तरुणाचा मृत्यू (अग्रवाल हॉस्पिटल चौक)
२४ ऑगस्ट : टँकरने दुचाकीला धडक दिल्यामुळे पवन सुरवाडे या तरुणाचा मृत्यू
२६ ऑगस्ट : सुसाट ट्रकच्या धडकेत तवेरातील १ ठार चार जखमी
---
१ सप्टेंबर : शांताराम केशव पाटील (रा.शिंदखेडा) यांचा मृत्यू
९ सप्टेंबर : कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
५ ऑक्टोबर : ललीत मनोहर झंवर (वय-३०) या तरुणाचा मृत्यू
१५ ऑक्टोबर : पाचोरा येथील तरुणाचा मृत्यू
---------