जिल्हा जिल्हा बँक निवडणूक--लोगोबँक निवडणूक--लोगो

जिल्हा जिल्हा बँक निवडणूक--लोगोबँक निवडणूक--लोगो
Published on: 
जळगाव जिल्हा बँक निवडणूक (लोगो) --- आमदार पुत्र सुमीत पाटीलचा अर्ज वैध --- नाशिक विभागीय सहनिबंधकांचा आदेश; निवडणुकीत पुन्हा चुरस सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १३ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत पाचोरा मतदारसंघातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमीत पाटील यांचा उमेदवारी अर्ज छाननीत अवैध ठरविला होता. तो अर्ज आता अपिलात वैध ठरविला आहे. नाशिक विभागीय सहनिबंधकांनी सुनावणीनंतर हा निर्णय दिल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पुन्हा चुरस निर्माण झाली आहे. जिल्हा बँकेच्या संचालकपदासाठी सुमीत पाटील यांनी पाचोरा तालुका प्राथमिक कृषी पतपुरवठा विकास सेवा संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, भाजपचे उमेदवार सतीश परशुराम शिंदे यांनी त्यांच्या अर्जावर हरकत घेतली होती. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छाननीअंती सुमीत पाटील यांचा अर्ज अवैध ठरविला होता. या निर्णयाविरोधात सुमीत पाटील यांनी नाशिक विभागीय सहनिबंधकांकडे अपील केले. त्यावर झालेल्या सुनावणीनंतर त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांना निवडणुकीत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिंदेची बिनविरोध शक्यता बदलली सुमीत पाटील यांचा अर्ज बाद झाल्यानंतर पाचोरा मतदारसंघातून भाजपचे सतीश शिंदे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता होती. मात्र, आता सुमीत पाटील यांचा अर्ज वैध ठरल्याने या मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र बदलले आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर सुमीत पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला होता. राजकीय दबावातून आपला अर्ज अवैध ठरविल्याचा आरोपही त्यांनी केला होता. निर्णयाची प्रत मिळण्यास विलंब होत असल्याचा दावा करत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या प्रकरणी न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. सुमीत पाटील यांच्या अर्जाला अपिलात मिळालेल्या मंजुरीमुळे पाचोरा मतदारसंघातील निवडणूक पुन्हा चर्चेत आली आहे. या घडामोडीचा जिल्हा बँकेतील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, याकडे सहकार क्षेत्रासह जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. माघारीसाठी केवळ दोन दिवस आता शनिवारी (ता. १४) व रविवारी (ता. १५) सुटी आहे. माघारीसाठी आता १६ व १७ असे दोन दिवस आहेत. यात कोण माघार घेते, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.