टुडे पान एकवर मेन फिचर
(याला तीन बातम्या वेगळ्या देतो, त्या क्लब कराव्यात)
---
जळगाव जिल्हा बँक निवडणूक (लोगो)
------
जिल्हा बँक निवडणुकीतील बिनविरोध उमेदवार
NSK26H35239- गुलाबराव पाटील
NSK26H35242--गिरीश महाजन
NSK26H35244-प्रा. चंद्रकांत सोनवणे
NSK26H35243- रोहित निकम
NSK26H35234 मधुकर राणे
NSK26H35245-रजनी सावकारे
NSK26H35246-- सोनल संजय पवार
NSK26H35247--जयश्री अनिल पाटील
NSK26H35248--सुमीत किशोर पाटील
NSK26H35249--मृणाल अमोल पाटील
NSK26H35250- नलिनी चिमणराव पाटील
NSK26H35251--सोमसिंग खुमानसिंग पाटील
----
पालकमंत्री पाटील, जलसंपदामंत्री महाजनांसह बारा जागा बिनविरोध
---
आता ९ जागांसाठी २९ ला मतदान; आज चिन्हवाटप
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १७ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माघारीच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी (ता. १७) नाटयमय घडामोडी घडत आठ जागा व पूर्वीच्या चार, अशा एकूण १२ जागा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. बिनविरोध झालेल्यांमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, पणन महासंघाचे अध्यक्ष रोहित निकम, जिल्हा बॅकेचे चेअरमन संजय पवार यांच्या पत्नी सोनल पवार, आमदार अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील आदी १२ उमेदवारांचा समावेश आहे.
एकूण २४१ उमेदवारांनी ४०२ अर्ज दाखल केले होते. माघारीच्या अखेरच्या दिवशी एकूण २०० उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. आता ४१ उमेदवार रिंगणात आहेत. ही निवडणूक जाहीर झाल्यानंतर जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापासून, उमेदवारी देणे, माघारी घेण्यापर्यंत शह-कटशहाचे राजकारण झाले. महायुती असूनही अनेक भाजप विरुद्ध शिवसेनेने, तर काही ठिकाणी शिवसेनेविरुद्ध भाजपच्या इच्छुकांनी अर्ज भरले होते. यामुळे नेमके माघार कोण घेतो, याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागून होते.
जागा वाटपाचा तिढा शेवटपर्यंत कायम
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीचा जागावाटपाचा तिढा माघारीपर्यंत व नंतरही कायम राहिला. पालकमंत्री, जलसंपदामंत्री, आमदार व खासदारांच्या झालेल्या बैठकीत भाजपला १० जागा, शिवसेना सात आणि राष्ट्रवादी काँग्रेस चार, असा महायुतीचा फॉर्म्युला निश्चित झाला होता. मात्र, तो शेवटपर्यंत कायम राहिला. मुक्ताईनगरची जागा शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाजपला सोडण्यास नकार दिल्याने तेथे बंडखोरी झाली आहे.
दरम्यान, ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीला एक ते दोन जागा देऊ, असे सांगितले होते. मात्र, शेवटपर्यंत एकही जागा महाविकास आघाडीला सोडण्यात आली नाही. महायुतीने आमचा विशवास घात केला, असा आरोप महाविकास आघाडीने केला आहे.
---
चौकट
या लढतींकडे लक्ष
मुक्ताईनगर विविध कार्यकारी मतदारसंघात भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे विरुद्ध शिवसेनेच्या देवयानी देशमुख व चाळीसगाचे आमदार मंगेश चव्हाण (भाजप) विरुद्ध शिवसेनेचे विजय पाटील व नारायण पाटील यांच्यात लढत होणार आहे.