जिल्हा बँक निवडणूक--

जिल्हा बँक निवडणूक--
Published on: 
जिल्हा बँक निवडणूक (लोगो) --- NSK26H34006, NSK26H34015 जळगाव : जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत शुक्रवारी अर्ज भरण्यासाठी झालेली गर्दी. दुसऱ्या छायाचित्रात उमेदवारी अर्ज दाखल करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील. शेजारी आमदार अमोल पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे आदी. --- बिनविरोध उमेदवारांचे फोटो NSK26H34016 : नलिनी पाटील NSK26H34017 : मृणाल पाटील NSK26H34018 : रजनी सावकारे --- शिवसेनेच्या दोन, तर भाजपची एक जागा बिनविरोध --- महायुतीच्या घोषणेपूर्वीच तीन जागा बिनविरोध; केंद्रीय मंत्री खडसे, पालकमंत्री पाटलांसह ४०२ अर्ज दाखल सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ३० : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत शुक्रवारी (ता. ३०) अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना मोठा वेग आला. विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून शिवसेनेच्या नलिनी चिमणराव पाटील (पारोळा), मृणाल अमोल पाटील (एरंडोल), तर भाजपचे वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे (भुसावळ) या बिनविरोध निवडून आल्या. या तिन्ही मतदारसंघांत इतर कोणाचाही अर्ज दाखल न झाल्याने ही निवड निश्चित झाली. दरम्यान, शुक्रवारी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह १८७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. आजअखेर एकूण ४०२ अर्ज दाखल झाले आहेत. पारोळा-एरंडोलमध्ये विजयाची परंपरा अबाधित पारोळा आणि एरंडोल मतदारसंघांमध्ये पाटील घराण्यांचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. माजी आमदार चिमणराव पाटील पारोळा मतदारसंघातून संचालक म्हणून गेल्या २० वर्षांपासून सलग बिनविरोध निवडून येत आहेत; तर आमदार अमोल पाटील एरंडोल मतदारसंघातून गेल्या १५ वर्षांपासून सातत्याने बिनविरोध विजयी झाले. या निवडणुकीतही विरोधकांकडून कोणताही अर्ज न आल्याने या दोन्ही मतदारसंघांतील बिनविरोध विजयाची ऐतिहासिक परंपरा कायम राहिली आहे. महायुतीत जागावाटपाचा तिढा; मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत एकीकडे शिवसेनेने दोन जागा बिनविरोध जिंकत आघाडी घेतली असली, तरी जिल्हा बँकेसाठी महायुतीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपमध्ये जागावाटपावर जवळपास तोडगा निघाला असला, तरी शिवसेना आणि भाजपमध्ये काही जागांवरून अजूनही पेच कायम आहे. या पार्श्वभूमीवर जागावाटपावर अंतिम तोडगा न निघाल्यास महायुतीत काही जागांवर मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते, असे स्पष्ट संकेत आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले आहेत. त्यामुळे उर्वरित जागांवर महायुती एकत्र लढणार, की आमनेसामने उभी ठाकणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ------- अर्ज भरलेले उमेदवार असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, संगीता भंगाळे, योगेश कोलते, माजी सभापती प्रभाकर सोनवणे, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, ॲड. ललिता पाटील, पांडुरंग काळे, चंद्रकांत बारेला, धनश्री देवकर, सुप्रिया पवार, पद्मजा देशमुख, डी. डी. वाणी, अतुल पाटील, प्रशांत पवार, आनंदराव देशमुख, शैलजादेवी निकम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश भालेराव, माजी अध्यक्ष राजीव पाटील, उदय पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, वैशाली पाटील, प्रदीप देशमुख आदी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.