मजकूर कमी पडल्यास जळगाव जिल्हा बँकेचा फोटो वापरावा
जिल्हा बँक मतदारयादी
हरकतींवर आज सुनावणी
शुक्रवारी निकाल; अंतिम यादी १४ ला प्रसिद्ध
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदारांची प्रारूप यादी जाहीर केल्यानंतर एकूण ५० हरकती दाखल झाल्या आहेत. यावर आता उद्या (ता.७) नाशिक सहनिबंधकाकडे सुनावणी होणार आहे. नऊ आक्टोबरला निकाल जाहीर होईल. तर १४ ऑक्टोबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. जिल्हा सहकार निवडणूक अधिकाऱ्यांनी दोन हजार ५६८ मतदारांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर ३० सप्टेंबरअखेरच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातून तब्बल ५० हरकती दाखल झाल्या आहेत. यात सर्वाधिक १५ हरकती जळगाव तालुक्यातून आल्या आहेत. जामनेर, पाचोरा व पारोळा या तीन तालुक्यांतून एकही आक्षेप नसल्याचे सांगण्यात आले. दाखल हरकतींमध्ये प्रामुख्याने मतदारांच्या नावातील दुरुस्ती, काही व्यक्तींची एकापेक्षा जास्त ठिकाणी आलेली नावे व तांत्रिक त्रुटींबाबत आक्षेप नोंदविले आहेत. मुक्ताईनगर तालुक्यातून ७, तर यावलमधून ५ हरकती आल्या आहेत. धरणगाव व एरंडोल तालुक्यांत प्रत्येकी ४ आक्षेप आहेत. चाळीसगाव, भडगाव, रावेर व बोदवड या तालुक्यांमधून प्रत्येकी तीन हरकती आहेत.
तालुकानिहाय आलेल्या हरकती
जळगाव १५, मुक्ताईनगर ७, यावल ४, धरणगाव ४, एरंडोल ४, रावेर ३, बोदवड ३, भडगाव ३, चाळीसगाव, ३, भुसावळ, १, अमळनेर, चोपडा १ अशा एकूण ५० हरकती आल्या आहेत.