NSK26H34787
जळगाव : शहरातील घाणेकर चौकात लक्ष्मीपूजनानिमित्त रविवारी खरेदीसाठी झालेली नागरिकांची गर्दी.
--------------
शहरातील चौका-चौकांत भरली जत्रा
--------
लक्ष्मीपूजनानिमित्त खरेदीसाठी नागरिकांची दुकानांत गर्दी
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ८ : शहरातील प्रमुख बाजारपेठा व चौकांमध्ये रविवारी(ता.८)देखील नागरिकांची दिवाळीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाल्याने चौकाचौकांना जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. सणासाठी लागणारे कपडे, मिठाई, फराळाचे साहित्य, सजावटीच्या वस्तू, पणत्या, आकाश कंदील व विद्युत रोषणाई खरेदीसाठी नागरिक बाजारात गर्दी करीत आहेत. त्यामुळे शहरातील प्रमुख चौकांना जत्रेचे स्वरूप आले होते.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठांमध्ये विविध वस्तूंची दुकाने सजली आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विक्रेत्यांकडून वेगवेगळ्या वस्तूंची मांडणी करण्यात आलेली आहे. सायंकाळच्या वेळी बाजारात गर्दी वाढत आहे. विशेष म्हणजे खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमुळे प्रमुख रस्त्यांवर वर्दळ वाढली आहे. कपडे, मिठाई, फराळ व घराच्या सजावटीच्या वस्तूंना ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. दिवाळीच्या खरेदीसोबतच भेटवस्तूंची खरेदीही सुरू आहे. लहान मुलांसाठी आकर्षक वस्तू, महिलांसाठी दागिने व सौंदर्यप्रसाधने, घर सजविण्यासाठी विविध साहित्य खरेदी करण्यात येत आहे. गर्दीमुळे काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. नागरिकांना सावकाश मार्ग काढावा लागत होता.
.......
अनेक भागांत वाहतूक कोंडी
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने शास्त्री टॉवर चौकात प्रचंड गर्दी निर्माण झाली होती. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मोठ्या प्रमाणावर वाहने या चौकात आल्याने व खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केल्याने वाहतूक पोलिसांची चागलीच तारांगळ उडाली.