घरकुल पूर्तीत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल!

घरकुल पूर्तीत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल!
Published on: 
टुडे एक ॲंकर --- (घरकुलाचे क्लीप आर्ट वापरावे) -- घरकुल उभारणीत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल (उपशीर्षक) ऑक्टोबरमधील उद्दिष्टाच्या ८३.४ टक्के कामे पूर्ण; बीड दुसऱ्या स्‍थानावर सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २० : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२ अंतर्गत घरकुलांची कामे पूर्ण करण्यात जळगाव जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. ऑक्टोबरमध्ये जिल्ह्याला ५ हजार ५५१ घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ४ हजार ६२९ घरकुलांची कामे पूर्ण झाली असून, जिल्ह्याने ८३.४ टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे. अर्थात मागील काही महिन्‍यातील झालेल्‍या कामामुळे जळगावने राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आघाडी घेतली आहे. ग्रामीण भागातील कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबविली आहे. या अंतर्गत टप्‍पा २ अंतर्गत कामे सध्‍या सुरू असून राज्य शासनाने यंदाच्‍या वर्षात १५ लाख घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या मोहिमेंतर्गत जिल्हानिहाय उद्दिष्टे देऊन कामांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेतला जात आहे. निर्धारित कालावधीत घरकुले पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून नियोजनावर भर दिला जात आहे. यामुळे टार्गेट पूर्ण करण्याकडे जिल्‍ह्याची वाटचाल सुरू आहे. घरकुलांचे उद्दिष्ट जळगाव जिल्ह्यात एकूण १ लाख ३३ हजार ६२० घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आतापर्यंत ५९ हजार ४२३ घरकुले पूर्ण झाल्याची नोंद आहे. १५ मे २०२६ पासूनच्या टप्प्यात जिल्ह्याला ७० हजार ८६५ घरकुले पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ३१ हजार ८९ घरकुले पूर्ण झाल्याचे अहवालात नमूद आहे. तर आता जिल्ह्याला ऑक्टोबर महिन्यासाठी दिलेल्या उद्दिष्टापैकी ४ हजार ६२९ घरकुले पूर्ण झाली आहेत. अद्याप ९२२ घरकुलांची कामे पूर्ण होणे बाकी आहे. इन्‍फो जिल्ह्याची ८३.४ टक्के उद्दिष्टपूर्ती ऑक्टोबर महिन्यातील उद्दिष्टपैकी जळगाव जिल्ह्याने ८३.४ टक्के उद्दिष्टपूर्ती केल्‍याचे नोंदविले आहे. या खालोखाल बीड जिल्ह्याला ६ हजार ३४४ घरकुले पूर्ण करण्याच्‍या उद्दिष्टापैकी ४ हजार ३३२ घरकुले पूर्ण झाली असून, तेथील उद्दिष्टपूर्ती ६८.३ टक्के आहे. तिसऱ्या स्‍थानावर असलेल्‍या परभणी जिल्ह्याने ४ हजार ७०६ पैकी ३ हजार ६४ घरकुले पूर्ण केली असून, तेथे ६५.१ टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. या तुलनेत जळगाव जिल्ह्याची कामगिरी सरस ठरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com