NSK26H35137
जळगाव : ज्युनियर राज्य आट्यापाट्या स्पर्धेतील विजेत्या संघासोबत मान्यवर.
–––
राज्य आट्यापाट्या स्पर्धेत जिल्हा सहाव्यांदा अजिंक्य
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : महाराष्ट्र राज्य आट्यापाट्या महामंडळाची ३७ वी मुले/मुली राज्य अजिंक्यपद आट्यापाट्या क्रीडा स्पर्धा नुकताच पार पडल्या. या स्पर्धेत जळगाव जिल्हा मुलांच्या संघाने धाराशिववर २ विरुद्ध ० सेट असा एकतर्फी विजय संपादन करून सलग सहा वेळा अजिंक्य होण्याचा सन्मान प्राप्त केला.
बोरली पंचतन (ता. श्रीवर्धन, जि. रायगड) येथे या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत जळगाव जिल्हा संघाने आक्रमणात व संरक्षणात चतुरस्र खेळ करीत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. अंतिम सामन्यात धाराशिवचा पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद प्राप्त केले. जळगाव संघाचा साहिल बिडकर हा स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू या पुरस्काराचा मानकरी ठरला आहे. विजेत्या संघातील खेळाडूंचे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रामध्ये सर्वत्र कौतुक होत आहे. तर जळगावच्या मुलींनीही तृतीय स्थान प्राप्त करून स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावत जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.
विजेत्या संघातील खेळाडूंना माजी खासदार धैर्यशील पाटील, श्रीवर्धन पंचायत समिती सभापती सचिन कीर, सुकुमार तोंडलेकर, मंदार तोडणकर, नंदू पाटील, उत्तम दिवेकर, गणेश पाटील, सुजित पाटील, रूपेश नांदेडकर, अक्षय तोडणकर, अभिजित तोडणकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र, विजयी ट्रॉफी, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. विजय संघातील खेळाडूंचे जळगाव जिल्हा आट्यापाट्या संघटनेचे अध्यक्ष आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी आमदार लता सोनवणे, जिल्हा संघटनेचे सचिव डॉ. प्रदीप तळवेलकर, जिल्हा संघटनेच्या कार्याध्यक्ष नगरसेविका डॉ. अमृता सोनवणे, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, प्रशांत जगताप, नगरसेवक डॉ. गौरव सोनवणे, डॉ. शंतनू भारद्वाज, राज्य कार्यकारणी सदस्य अनिल माकडे, शिवछत्रपती पुरस्कारार्थी विशाल फिरके, विजय न्हावी यांनी केले आहे.
इन्फो
विजेत्या संघातील खेळाडू
भावेश सोनवणे (कर्णधार), महेश पाटील, साहिल बिडकर, साई वाणी, आतिश पाटील, ओम गायकवाड, निखिल पाटील, ओम गोपाळ, भावेश चौधरी, तन्मय डोळे, अनमोल तेलंग, सोहेल तडवी, कुंदन बाविस्कर, साकेत खाटीक, भावेश जैन, संघ व्यवस्थापक: अँड. अक्षय टेमकर, प्रशिक्षक – रोहित नवले.