‘लक्षातवेधी’ जळगावतर्फे ‘आठवणीतल्या कविता

‘लक्षातवेधी’ जळगावतर्फे ‘आठवणीतल्या कविता
Published on: 
NSK26H34709 जळगाव : काव्यवाचन कार्यक्रमात उपस्थित मान्यवर व सादरकर्ते. ‘लक्षातवेधी’तर्फे आठवणीतल्या कविता शहरातील भाऊंच्या उद्यानात कार्यक्रम; रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ७ : शहरातील भाऊंचे उद्यानात ‘आठवणीतल्या कवितांच्या सुरेल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘लक्षातवेधी’ यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सुरुवात अंजली धुमाळ यांच्या सुरेल गायनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन महापौर दीपामाला काळे यांच्या हस्ते झाले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून डॉ. हेमंत कुळकर्णी, ज्येष्ठ रंगकर्मी चिंतामन पाटील, शरद पांडे, विनोद ढगे, गीतांजली ठाकूर यांच्या नांदी कवितेने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कार्यक्रमात आयोजकांच्या वतीने वंदना नेवे, डॉ. हेमंत कुळकर्णी, मंगेश हिवरकर, चितमान पाटील, प्रा. संजय निकुंभ, विनोद ढगे, जगदिश नेवे, गितांजली ठाकरे, मानसी नेवे, शरद पांडे, मिलिंद नेवे आदी मान्यवरांचा तुळशी रोप देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान प्रा. राजेंद्र पाटील, मानसी नेवे, प्रतिभा याज्ञिक, प्रतीक्षा वाणी यांनी विविध प्रसिद्ध काव्य सादर केले. अभिवाचन योगेश, सोमन यांच्या जोडीने सत्यम शोधन सुंदमच्या एकांकिकेचे अभिवाचन करून उपस्थितांना खिळवून धरले. या कार्यक्रमाला धनंजय राजहंस किरण अडकमोल, मिलिंद नवले, योगेश हिवरकर, प्रा. संजय निकुंभ, वंदना नेवे, स्वप्नाली हिवरकर, पंकज पवार, ललित जोशी यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमात जगदिश नेवे यांनी आभार मानले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली, असून या सुंदर कार्यक्रमास जळगावकर रसिकांची मोठी उपस्थिती लाभली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.