मालमत्ता कर वसुलीला यंदा वेग; सात महिन्यांत ५२ कोटींचा टप्पा

मालमत्ता कर वसुलीला यंदा वेग; सात महिन्यांत ५२ कोटींचा टप्पा
Published on: 
टुडे पान ३ मेन फिचर --- (महापालिका इमारतीचा फोटो वापरावा) --- मालमत्ता करवसुलीचा सात महिन्यांत ५२ कोटींचा टप्पा मागील वर्षाच्या तुलनेत दिवाळीपर्यंत मोठी झेप; थकबाकीदारांकडेही महापालिकेचा मोर्चा सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : मागील आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीचा घसरलेला आलेख यंदा सुधारताना दिसत आहे. जळगाव महापालिकेने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत तब्बल ५२ कोटी रुपयांची वसुली केली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी दिवाळीपर्यंत अवघी ३० कोटी रुपयांची वसुली झाली होती. त्या तुलनेत यंदा दिवाळीच्या काळातच वसुलीने समाधानकारक टप्पा गाठल्याने महसूल विभागाला दिलासा मिळाला आहे. महापालिकेची मालमत्ता कर वसुलीची मुदत ३१ मार्चपर्यंत असते. शहरातील मालमत्ता कर आणि वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली थकबाकी लक्षात घेता महापालिकेसमोर सुमारे २०० ते २४० कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट असते. मात्र, दरवर्षी प्रत्यक्ष वसुली ८० ते १०० कोटी रुपयांच्या आसपासच होत असल्याने अपेक्षित महसूल मिळविण्याचे आव्हान कायम आहे. यंदा एप्रिलपासूनच वसुलीला गती देण्यासाठी आयुक्त आदित्य जिवने आणि महसूल विभागाच्या उपायुक्त धनश्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न सुरू करण्यात आले. मालमत्ताधारकांशी थेट संपर्क, थकबाकी भरण्यासाठी पाठपुरावा आणि विविध माध्यमांतून जनजागृती अशा उपाययोजनांवर भर देण्यात आला. त्याचा सकारात्मक परिणाम सात महिन्यांच्या वसुलीतून दिसून येत आहे. थकबाकीदारांकडे लक्ष शहरातील अनेक मालमत्ताधारकांकडे अनेक वर्षांपासून कराची थकबाकी प्रलंबित आहे. अशा मालमत्ताधारकांशी अधिकारी आणि कर्मचारी संपर्क साधून थकबाकी भरण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. त्यामुळे नियमित करासोबत थकबाकी वसुलीतही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चौकट मागील वर्षी ८६ कोटींचीच वसुली आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये महापालिकेला केवळ ८६ कोटी ६४ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल करता आला होता. निवडणुकीच्या कामकाजामुळे वसुलीवर परिणाम झाल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. यंदा सुरुवातीपासूनच वसुलीवर भर दिल्याने चित्र बदलताना दिसत आहे. मात्र, २०० कोटींहून अधिकच्या उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंतची ५२ कोटींची वसुली पाहता उर्वरित काळात महसूल विभागाला वसुलीचा वेग आणखी वाढवावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.