टुडे १, मेन (एक फोटो मोठा, ४ कॉलम करावा)
-----
NSK26H32663
जळगाव : रिंगरोडवरील एका बाजूने बंद केलेला रस्ता.
--------------
NSK26H32664 (हा फोटो चार कॉलम करावा)
मध्यवर्ती व वर्दळीच्या भागातील रिंगरोडवर सुरू असलेले काम.
--------------
NSK26H32665
महामार्गालगत समांतर रस्त्यावर सुरू असलेले काम.
--------------
NSK26H32666
समांतर रस्त्याचे झालेले कॉंक्रिटीकरण.
--------
जळगावकरांची चारही बाजूने कोंडी, जीवही धोक्यात
उपशीर्षक
वळणरस्ता बंदच; महामार्गालगत सेवारस्त्यांसह रिंगरोडच्या कामाचा अडथळा
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १६ : असोदा रेल्वे उड्डाणपूल खचल्यानंतर तीन महिन्यांपासून महामार्गावरील बाह्यवळण रस्ता (बायपास) वाहतुकीसाठी बंद आहे. शहरातील महामार्गासह सेवारस्त्यांचे कामही रखडलेले.. शहरातील मध्यवर्ती भागातील प्रमुख रिंगरोडचे संथगतीने सुरू असलेले काम..महामार्गाच्या चौकांमधील वाहतूक कोंडी.. बाजारपेठेतील रस्त्यांवरील अतिक्रमण.. अशा एक ना अनेक घटकांमुळे जळगावकरांची चारही बाजूने कोंडी झाली आहे.
प्रशासनाची उदासीनता आणि वाहतूक शाखेचे दुर्लक्ष यामुळे शहरातील महामार्ग, त्यावरील चौक, लगतचे सेवारस्ते, शहरातील दुरवस्था झालेले रस्ते नागरिकांच्या जिवावर उठले आहेत.
१४-२
अडीच महिन्यांत ९ बळी
३१ जुलैस जळगाव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले होते. या पावसाचा तडाखा महामार्गावरील पाळधी- तरसोद वळणरस्त्यावरील असोदालगतच्या रेल्वे उड्डाणपुलालाही बसला. पुलाचा भराव खचल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सर्व अवजड वाहनांची वाहतूक त्यामुळे शहरातील महामार्गावरुन वळविण्यात आली. तेव्हापासून शहरातील महामार्गावर वाहतुकीचा ताण वाढून अपघातही वाढलेत. गेल्या अडीच महिन्यांत महामार्गावर ९ जणांचे बळी गेले असून वळणरस्ता सुरू कधी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
१४-२
महामार्गाच्या कामामुळेही अडचण
सन २०२२ मध्ये पूर्ण झालेल्या शहरातील चौपदरी महामार्गाची एक- दोन वर्षांतच दुरवस्था झाली. त्यामुळे या मार्गाच्या कॉंक्रिटीकरणाचे काम दोष दायित्व कालावधीच्या आधीच सुरु करण्यात आले. त्यासाठी संबंधित कंत्राटदाराने चौपदरी महामार्गासह सेवारस्त्यांचे स्क्रॅपिंग करुन ठेवलेय. सोबत महामार्गाला लागून सेवारस्त्यांचेही काम सुरू असून ठिकठिकाणी हे रस्ते कामासाठी बंद करुन ठेवण्यात आले आहेत. स्क्रॅपिंगमुळे वाहने घसरून ती अवजड वाहनांखाली येऊन अपघातांचा धोका वाढला आहे. शहरात गेल्या काही दिवसांत याच कारणांमुळे अपघात होऊन तरुणांचे बळी गेले आहेत. शिवाय, हे कामही अगदीच संथगतीने सुरू असल्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागतेय.
चौकट
रिंगरोडचे काम सुरू; रस्ता किती दिवस बंद?
शहरातील मध्यवर्ती भागातील रिंगरोडच्या कॉंक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सिंधी कॉलनीपासून थेट पिंप्राळा रेल्वे उड्डाणपुलापर्यंतचा हा रस्ता अक्षरश: खड्डयांमध्ये गेला होता. त्याचे काम सुरूझाले असले तरी ते संथगतीने सुरू आहे. अनेक महिन्यांपासून हे काम सुरू असून काही ठिकाणी रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याने या रस्त्यावर विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची पंचाईत होतेय. या रस्त्यावर अनेक रुग्णालये आहेत, त्यामुळे रुग्णांचेही हाल होत आहेत.
चौकट
अतिक्रमणांमुळेही कोंडी
महामार्गावर बहुतांश ठिकाणी दुतर्फा, चौकांमध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. कुठे ट्रकचा वाहनतळ, कुठे विक्रेत्यांची दुकाने तर कुठे वाहनांची बेशिस्त पार्किंग यामुळे हे चौकही धोकादायक बनले आहेत. अतिक्रमण निर्मूलनाबाबत महापालिका प्रशासन गंभीर नाही, बेशिस्त वाहतुकीसाठी पोलिस बघ्याच्या भूमिकेत.
-----------