सुप्रीम कॉलनीत ३० अनधिकृत ओटे जमीनदोस्त

सुप्रीम कॉलनीत ३० अनधिकृत ओटे जमीनदोस्त
Published on: 
सेकंड मेन NSK26H35226 जळगाव : सुप्रीम कॉलनीत तोडण्यात आलेले अनधिकृत ओटे. --- NSK26H35228 आयटीआयजवळील समांतर रस्त्यालगत खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अतिक्रमण केलेले साहित्य जप्त करताना अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी. ---- सुप्रीम कॉलनीत ३० अनधिकृत ओटे जमीनदोस्त गटारींच्या स्वच्छतेतील अडथळे दूर; महामार्गालगतच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरही कारवाई सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १७ : रस्त्यालगतच्या गटारींवर अनधिकृतपणे बांधण्यात आलेले ओटे आणि महामार्गाच्या जागेत थाटण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने कारवाई केली. सुप्रीम कॉलनी परिसरात घरांसह दुकानांसमोरील सुमारे ३० अनधिकृत ओटे तोडण्यात आले. तर महामार्गावरील आयटीआयजवळील समांतर रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. सुप्रीम कॉलनी परिसरातील अनेक घरमालक आणि दुकानदारांनी रस्त्यालगत असलेल्या गटारींवर अनधिकृतपणे ओटे बांधले होते. त्यामुळे गटारींची स्वच्छता करताना महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना अडचणी येत होत्या. ओट्यांमुळे गटारींचा प्रवाहही अडवला जात असल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नव्हता. परिणामी गटारी तुंबणे आणि अस्वच्छतेच्या समस्या निर्माण होत होत्या. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच मनपाच्या आरोग्य विभागाकडून अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त पंकज गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मूलन विभाग अधिक्षक संजय ठाकुर व त्यांच्या पथकाने कारवाई करत सुमारे ३० ओटे तोडून गटारींच्या स्वच्छतेतील अडथळे दूर केले. महामार्गालगत कारवाई दरम्यान, महामार्गावरील आयटीआयजवळील समांतर रस्त्यावर तसेच महामार्गाच्या जागेत खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून गाड्या लावण्यात येत होत्या. या ठिकाणी विक्रीसाठी मांडण्यात आलेल्या साहित्यामुळे रस्त्याच्या जागेचा वापर अतिक्रमणासाठी होत असल्याने महापालिकेच्या पथकाने तेथेही कारवाई केली. या कारवाईत खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या ५० खुर्च्या आणि २५ टेबल जप्त करण्यात आले. चौकट समांतर रस्त्यांचा वापर वाहन पार्किंगासाठी जळगाव शहरातून गेलेल्या महामार्गाच्या दोन्ही बाजूला समांतर रस्त्यांचा काँक्रिटीकरणाचे कामे काही ठिकाणी पूर्ण तर काही ठिकाणी सुरू आहे. परंतु तयार झालेले या रस्त्यांवर वाहनांच्या वर्दळीचा वापरापेक्षा तेथे हॉकर्स सोबतच रस्त्यांलगत असलेले हॉटेल, दवाखाने तसेच अन्य व्यवसायिकांच्या ग्राहकांचे वाहने पार्किंग केले जात आहे. त्यामुळे समांतर रस्त्यावरून येण्या जाणाऱ्या वाहनांना अगदी कमी जागेतून मार्ग काढावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.