वाघनगरच्या जलवाहिनीतून लाखो लिटर पाण्याची नासाडी

वाघनगरच्या जलवाहिनीतून लाखो लिटर पाण्याची नासाडी
Published on: 
टुडे पान ३ मेन फिचर NSK26H31667 जळगाव : वाघूर धरणावरून वाघनगरसाठी असलेल्या जलवाहिनीच्या एअर व्हॉलमधून पाण्याची होणारी नासाडी. ---- वाघनगरच्या जलवाहिनीतून लाखो लिटर पाण्याची नासाडी आठ एअर व्हॉलमधून पाण्याचा ओघ; १० हजार घरांना मात्र आठ-दहा दिवसांनी पाणी सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ७ : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर एकीकडे पाण्याची प्रत्येक थेंब बचत करण्याचे आवाहन शासनाकडून केले जात असताना, जळगाव शहरालगतच्या वाघनगर परिसरात मात्र लाखो लिटर पाण्याची अक्षरशः नासाडी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमृत योजनेअंतर्गत वाघूर धरणावरून वाघनगरसह वाढीव वस्तीला पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेल्या जलवाहिनीवरील तब्बल आठ एअर व्हॉलमधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून, संबंधित यंत्रणांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. सावखेडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या वाघनगर परिसरात सुमारे पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत अमृत योजनेअंतर्गत जलवाहिनी टाकण्यात आली. मात्र, जलवाहिनी टाकल्यानंतर तिच्या देखभाल-दुरुस्तीकडे अपेक्षित लक्ष दिले गेले नसल्याचे चित्र आहे. जलवाहिनीवरील एकूण १६ एअर व्हॉलपैकी तब्बल आठ व्हॉलमधून सतत पाणी बाहेर पडत आहे. परिणामी दररोज मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असून, पाणीटंचाईच्या काळात या नासाडीबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. दहा दिवसानंतर मिळते पाणी विशेष म्हणजे, ज्या वाघनगरसह कोल्हे हिल्स परिसरातील नागरिकांसाठी ही जलवाहिनी टाकण्यात आली, त्याच भागातील सुमारे ८ ते १० हजार घरांना आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी टँकर, खासगी पाणीपुरवठा किंवा साठवलेल्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. एका बाजूला पाण्याचा थेंब मिळविण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू असताना दुसऱ्या बाजूला जलवाहिनीतून लाखो लिटर पाणी वाहून जाण्याचे चित्र संतापजनक असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. यापूर्वी नागरिकांचे आंदोलन पाणीपुरवठ्याच्या अनियमिततेविरोधात वाघनगरातील नागरिकांनी यापूर्वी आंदोलनही केले आहे. त्यानंतरही जलवाहिनीच्या गळतीचा प्रश्न कायम असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चौकट पालकमंत्र्यांनी लक्ष देणे गरजेचे शासनाकडून पाणी बचतीचे धोरण राबविले जात असताना त्याच शासनाच्या यंत्रणेकडून पाण्याची अशी उघड नासाडी कशी काय सुरू राहू शकते? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. सावखेडा ग्रामपंचायत आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून वाघनगरसाठी या जलवाहिनीचा शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्तेच करण्यात आला होता. त्यामुळे या जलवाहिनीच्या गळतीच्या दुरवस्थेकडे पालकमंत्रींनी लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून सर्व नादुरुस्त एअर व्हॉल दुरुस्त करावेत आणि वाया जाणारे पाणी रोखावे, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com