विविध ४० पक्षी प्रजातींची नोंद

विविध ४० पक्षी प्रजातींची नोंद
Published on: 
जामन्यात निसर्गभ्रमंती उपक्रमात विविध ४० पक्षी प्रजातींची नोंद सकाळ वृत्तसेवा पाल (ता. रावेर), ता. ७ ः वन्यजीव सप्ताहानिमित्त जामन्या वन्यजीव क्षेत्रात नुकत्याच करण्यात आलेल्या पक्षी निरीक्षण, पक्षी अभ्यास व निसर्गभ्रमंती उपक्रमात स्थानिक तसेच स्थलांतरित अशा सुमारे ४० पक्षी प्रजातींची नोंद करण्यात आली. यामध्ये स्थलांतरित युरोपियन निळकंठ या पक्ष्याचे दर्शन विशेष लक्षवेधी ठरले. निळसर व हिरवट रंगाची झळाळी, पाठीवरील तपकिरी-तांबूस छटा आणि उड्डाणावेळी दिसणारे निळे पंख ही युरोपियन निळकंठाची वैशिष्ट्ये आहेत. निसर्ग भ्रमंतीदरम्यान लांडगा, कोल्हा आणि बिबट्याच्या विष्ठाही आढळल्या. त्यामुळे जामन्या वन्यजीव क्षेत्रात पक्ष्यांसह विविध वन्यजीवांचा अधिवास असल्याचे स्पष्ट झाले. चातक निसर्ग संवर्धन संस्था व जामन्या वन्यजीव क्षेत्र यांच्या विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी पक्षीतज्ज्ञ अनिल महाजन, तुषार पाटील व योगेश पाटील यांनी विविध पक्ष्यांची ओळख, अधिवास, वर्तन आणि पक्षी निरीक्षणाच्या पद्धतींबाबत मार्गदर्शन केले. उपवनसंरक्षक कृष्णा भवर व सहायक वनसंरक्षक सत्यजित निकम यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेशकुमार दुसाने यांनी त्याचे नियोजन केले. वनपरिमंडळ अधिकारी, वनरक्षक व संरक्षण मजूरही यावेळी उपस्थित होते. -----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com