‘जनजाती’ दिनावरून कॉंग्रेस-भाजपात जुंपली

‘जनजाती’ दिनावरून कॉंग्रेस-भाजपात जुंपली
Published on: 
(कृपया, बातमीत दोघांचे स्टेटमेंट आजूबाजूला घ्यावे.) --- ‘जनजाती’ गौरव दिनावरून कँग्रेस-भाजपत जुंपली आजी-माजी खासदारांमध्ये आरोप-प्रत्यारोप सकाळ वृत्तसेवा नंदुरबार, ता. १६ ः आदिवासींना ‘जनजाती’ संबोधने हे अपमानस्पद असून, याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी काँग्रेसचे खासदार ॲड. गोवाल पाडवी यांनी केली आहे. तर ‘जनजाती’ शब्द हा संविधनात असून, जनजाती गौरव दिनाला विरोध करणाऱ्यांवरच गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी मागणी भाजपच्या माजी खासदार डॉ. हीना गावित यांनी केली आहे. जनजाती गौरव दिन साजरा करण्यावर दोन्ही पक्षांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू झाल्याने जिल्ह्याचे राजकारण तापले आहे. --- ‘जनजाती’ शब्दावर आक्षेप : खासदार गोवाल पाडवी देशभरात जनजाती गौरव सप्ताह साजरा केला जात आहे. मात्र आदिवासींना ‘जनजाती’ संबोधने अपमानास्पद आहे. त्यामुळे आदिवासींना जनजाती संबोधनाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जावेत, अशी मागणी ॲड. खासदार गोवाल पाडवी यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. ॲड. पाडवी म्हणाले, की जागतिक आदिवासी दिनाचे महत्त्व कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून जनजाती गौरव दिन साजरा होत आहे. मात्र आदिवासींनी जनजाती संबोधने गैर आहे. याप्रकारणी संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. तसेच संविधनात अनुसूचित जमातीऐवजी आदिवासी शब्द वापरावा, अशी मागणीदेखील त्यांनी केली. --- ‘जनजाती’ शब्द संविधानानुसारच : डॉ. हीना गावित भारतीय संविधानात ‘जनजाती’ हा शब्द आहे. मात्र खासदार ॲड. गोवाल पाडवी यांना याची माहिती नाही. त्यामुळे जनजाती गौरव दिन साजरा करण्यास विरोध करणारे खासदार ॲड. गोवाल पाडवी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी माजी खासदार डॉ. हीना गावित यांनी माध्यमांशी बोलताना केली. जनजाती गौरव दिवस संपूर्ण भारतात साजरा करण्याची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात अनुसूचित जमाती शब्दाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे खासदार ॲड. पाडवी यांनी संविधनावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करू नये, असेही डॉ. हीना गावित यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.