जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रभागरचनेचा आराखडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाशिक : आगामी महापालिका निवडणुक

नाशिक : जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रभागरचनेचा आराखडा

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीसाठी तयार केलेल्या १३३ जागा व ४४ प्रभागांच्या कच्चा प्रभागरचनेचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केल्यानंतर आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात तो प्रसिद्ध होण्याची शक्यता महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी व्यक्त केली.

पुढील वर्षात राज्यातील २२ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने कच्ची प्रभागरचना तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला होता. नाशिक महापालिका हद्दीत १३३ जागांसाठी ४४ प्रभाग असणार असून, त्यात ४३ प्रभाग तीनसदस्यीय, तर एक प्रभाग चार सदस्यांचा राहणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने ३० नोव्हेंबरपर्यंत महापालिका क्षेत्रासाठी प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा: राज्यात आज मध्यरात्रीपासून नवे निर्बंध लागू; अनिल परबांची घोषणा

२९ नोव्हेंबरला राज्य निवडणूक आयोगाकडे कच्चा प्रभागरचनेचा आराखडा सादर केला. ११ डिसेंबरला राज्य निवडणूक आयोगाकडून छाननी करण्यात आली. रस्ते, चतु:सीमा, नदी-नाले याबाबतच्या नियमांचे पालन झाले का याची तपासणी केली. त्यानंतर म्हणजे २० डिसेंबरपर्यंत प्रभागरचना जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, त्यानुसार प्रभागरचना जाहीर झाली नाही. मात्र, महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्या अंदाजानुसार जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रभागरचना जाहीर होईल. त्यानंतर हरकती व सूचना मागविल्या जातील. त्यानंतर अनुसूचित जाती-जमाती गटाचे आरक्षण टाकले जाईल.

मार्चमध्ये निवडणुका

जानेवारीत प्रभागरचना जाहीर झाल्यास मार्चमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. २०२० मध्ये मुदत संपुष्टात आलेल्या महापालिकांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात, तर दुसऱ्या टप्प्यात मार्च २०२२ पर्यंत मुदत संपुष्टात आलेल्या महापालिकांच्या निवडणुका होतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

Web Title: January In The First Week Ward Composition Plan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top