Jarange Patil Sabha: जरांगे पाटलांची 9 ला येवल्यात विराट सभा! तयारी पूर्णत्वाकडे; लाखो मराठा समाज जमणार

manoj jarange patil
manoj jarange patilEsakal

येवला : बाजार समिती आवारात ९ ऑक्टोबरला सकाळी दहाला मनोज जरांगे-पाटील यांची जाहीर सभा होणार असून, लाखो समाजबांधव सभेला जमणार असल्याची माहिती सकल मराठा समाजातर्फे देण्यात आली. (Jarange Patil meeting on 9th Preparation towards completion Lakhs of Maratha community will gather nashik)

सकल मराठा समाजातर्फे तहसील कार्यालय आवारात ठिय्या आंदोलन सुरू असून, या ठिकाणी भेट देऊन जरांगे-पाटील सभेसाठी रवाना होणार आहेत. जरांगे-पाटील महाराष्ट्राचा दौरा करीत असून, प्रत्येक ठिकाणी त्यांना जनसमुदाय पाठिंबा देत आहे.

त्यामुळे तालुक्यातही तितक्याच ताकतीची विराट सभा व्हावी, म्हणून तालुका सकल मराठा समाजातर्फे प्रत्येक गावांत सभेचे मोठे बॅनर लावण्यात येत आहेत. सभा, ठिकाणाची परवानगी पोलिस परवानगीसह इतर प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.

सभेसाठी येवल्यासह लासलगावच्या ४२ गावांसह तालुक्यातून मोठ्या संख्येने मराठा समाज उपस्थित असणार असल्याची माहितीही देण्यात आली. सभेसाठी अंदाजे १ लाखापेक्षा जास्त जनसमुदाय येऊ शकतो, असा अंदाज वर्तविला जात आहे.

manoj jarange patil
Maratha Reservation: कोणतीही बनवाबनवी न करता मराठा समाजाला आरक्षण दिलेच पाहिजे - मनोज जरांगे पाटील

पार्किंग, बैठक व्यवस्थेचे काटेकोर नियोजन केले जात आहे. प्रत्येक गावातील प्रमुखांसह समाजाचे काम करणाऱ्या प्रत्येक घटकाला विश्वासात घेऊन सभेची जोरदार तयारी सुरू आहे. जास्तीत जास्त समाजबांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाने केले आहे

दरम्यान, ठिय्या आंदोलनात संजय सोमासे, निंबा फरताळे, विजय मोरे, रवी शेळके, जालिंदर मेंडकर, गणेश सोमासे, बाळासाहेब देशमुख, कृष्णा जमदाढे, प्रतीक आवटे, उत्तम घुले, गोरख संत, गोरख कोटमे, प्रफुल्ल गायकवाड, सागर नाईकवाडे, सुनील कोटमे, विष्णू कव्हात, रामनाथ ढोमसे, संदीप बर्शीले, किरण कोल्हे, रमेश साताळकर यांच्यासह सकल मराठा समाजाचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत.

manoj jarange patil
Maratha Reservation : "...मग मलाच एकट्याला का बोलता?"; मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळांचा मनोज जरांगेना सवाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com