पान-२ सेमेन
VNI26B13169
लातूर ः नवोदय विद्यालय समितीअंतर्गत आयोजित २८ व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत खेडगाव येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक प्रथम क्रमांकाचे बक्षीस स्वीकारताना.
-------------------
३६-३
खेडगाव नवोदय विद्यालय राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम
-----------
राष्ट्रीय युवा संसद स्पर्धा ः ८९.६० टक्के गुण, राज्यातील ७३ विद्यालये सहभागी
सकाळ वृत्तसेवा
वणी- लखमापूर, ता. ९ : भारत सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयाच्या वतीने नवोदय विद्यालय समितीअंतर्गत आयोजित २८ व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, खेडगाव (जि. नाशिक) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा या तीन राज्यांतील ७३ जवाहर नवोदय विद्यालयांमधून खेडगाव विद्यालयाने ८९.६० गुण मिळवत राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले. स्पर्धेचा अंतिम टप्पा पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, लातूर येथे पार पडला.
--------------
विद्यार्थ्यांमध्ये संसदीय लोकशाही, संविधानिक मूल्ये, लोकप्रतिनिधींची जबाबदारी आणि संसदीय कामकाजाची समज विकसित व्हावी, या उद्देशाने स्पर्धा झाली. अंतिम फेरीत जवाहर नवोदय विद्यालय, मेहसाणा (गुजरात), जवाहर नवोदय विद्यालय, गडचिरोली आणि खेडगाव विद्यालयाची निवड झाली होती. प्रश्नोत्तरांचा तास, सभागृहातील चर्चा, संवादकौशल्य, शिस्त आणि भूमिकांचे सादरीकरण या निकषांवर मूल्यमापन करण्यात आले.
लातूरचे माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, नवोदय विद्यालय समितीचे पुणे विभागीय सहाय्यक आयुक्त विश्वनाथ खिलार आणि पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय, सांगलीचे प्राचार्य गणपत मस्के यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. अंकुश फसले, अशोक लिमये आणि ज्ञानेश्वर राऊत यांनी विद्यार्थ्यांच्या तयारीचे नियोजन केले. प्राचार्य शिवरुद्र स्वामी, उपप्राचार्य बोऱ्हाडे, शुभांगी लोडम, सुनीता साबळे, योगिता पाटील आणि नितीन बुदगे यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विद्यालयाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
---------------
१६-१
४८ विद्यार्थ्यांचा सहभाग
खेडगाव विद्यालयाच्या ४८ विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला. अमेय अहिरे यांनी अध्यक्ष, मनस्वी गायकवाड यांनी उपाध्यक्ष, पार्थ पवार यांनी पंतप्रधान, साईराज काटकर यांनी गृहमंत्री, सोनवणे यांनी विज्ञानमंत्री तर कल्पेश चौरे यांनी विरोधी पक्षनेते अशी भूमिका साकारली. विद्यार्थ्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीने आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने विद्यालयाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली.
------------------