५५ हजारांची रोकड,

५५ हजारांची रोकड,
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी -- फोटो क्रमांक ः 35341 नकाणे ः जवाहर नवोदय विद्यालय वसाहतीत घरफोडीनंतर खोलीत पसरलेले साहित्य. - नवोदय विद्यालय वसाहतीत घरफोडी - नकाणे शिवारात ५५ हजारांची रोकड; दागदागिने लांबविले - सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १८ ः नकाणे शिवारातील जवाहर नवोदय विद्यालय परिसरातील कर्मचारी वसाहतीत चोरट्यांनी उच्छाद मांडला. एका कर्मचाऱ्याच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे ५५ हजारांची रोकड आणि सोन्याच्या दोन अंगठ्यांवर डल्ला मारला. शिवाय अन्य दोन घरांचेही कुलूप तोडण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, परिसरातील चोरीच्या वाढत्या सत्रामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विद्यालयातील कर्मचारी अनिल पाटील दोन दिवसांपासून विद्यार्थ्यांना खेळाच्या स्पर्धेसाठी बाहेरगावी घेऊन गेले होते. घराला कुलूप असल्याची संधी साधत चोरट्यांनी त्यांच्या बंद निवासस्थानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील साहित्याची फेकाफेक करत चोरट्यांनी कपाटातील ५५ हजार रुपयांची रोकड आणि सोन्याच्या दोन अंगठ्या लांबवल्या. त्याच परिसरातील दुसऱ्या एका घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न झाला, मात्र तेथील हाती काही लागले नाही. तिसऱ्या घराचे कुलूप तोडत असतानाच काही नागरिकांच्या हालचाली व आवाज झाल्याने चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पश्‍चिम देवपूर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक जिभाऊ पाटील पथकासह घटनास्थळी दाखल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.