SHC26B13525
शिरपूर : जयेश मिरकरचे कौतुक करतांना सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल, प्रीतेश पटेल आदी.
---------------
पटेल सीबीएसईचा जयेश मिरकर
राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र
शिरपूर, ता. २२ : श्री विलेपार्ले केळवणी मंडळ, मुंबई संचलित तांडे (ता. शिरपूर) येथील मुकेश आर. पटेल निवासी सीबीएसई स्कूलचा विद्यार्थी जयेश मिरकर याची सीबीएसई राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी नुकतीच निवड करण्यात आली. लोणावळा येथे आयोजित १७ वर्षांखालील सीबीएसई दक्षिण विभागीय- २ क्रिकेट स्पर्धेत त्याने उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन करीत त्याने आपले स्थान निश्चित केले.
शाळेचा दुसरा विद्यार्थी नैतिक चौधरी यानेही उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत लक्षवेधी कामगिरी बजावली. या दोन्ही खेळाडूंनी एकूण ९०० खेळाडूंमधून अव्वल ६० खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. त्यांच्या संघाने कांस्यपदक पटकावले. या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांतील विविध सीबीएसई शाळांचे संघ सहभागी झाले होते. राष्ट्रीय स्तरावर निवड झाल्यानंतर तो तामिळनाडूतील मदुराई येथे १६ ते ३० ऑक्टोबरदरम्यान होत असलेल्या सीबीएसई राष्ट्रीय क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होणार आहे. विद्यार्थ्यांच्या यशाचे संस्थाध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, सहअध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष चिंतनभाई पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, प्रीतेश पटेल, प्राचार्या श्रीमती मंजू सिंह, क्रीडा संचालक किरण आंचन, क्रीडा समन्वयक कुणाल सुर्वे, धीरज पाटील यांनी कौतुक केले. त्यांना क्रिकेट प्रशिक्षक दीपक जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.