नाशिक- शहरातील हक्काची बाजारपेठ असलेल्या मेनरोड, दूध बाजार व भद्रकाली परिसरात सातत्याने रस्त्यावरील अतिक्रमण वाढत असल्याने महापालिकेकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नाशिक शहरातील गावठाणातील अतिक्रमणाची समस्या सोडविण्यासाठी भाजप आमदारांनी विधिमंडळ अधिवेशनात प्रश्न मांडला आहे.