नाशिक- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये प्रवेशासाठी जेईई मेन्स परीक्षेच्या एप्रिलमधील दुसऱ्या सत्राचे आयोजन २ ते ९ एप्रिलदरम्यान केले जाणार आहे. या संदर्भात नॅशनल टेस्टिंग एजन्सीने तारखांची घोषणा केली आहे. यापूर्वी जानेवारी सत्रात जेईई मेन्स परीक्षा घेतली होती.