JEE Main Exam
sakal
नाशिक: राष्ट्रीय पातळीवरील जेईई मेन्स परीक्षेला बुधवारी (ता. २१) सुरवात झाली. नाशिकमधील दहा परीक्षा केंद्रांवर झालेल्या या परीक्षेस पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांची सुमारे ९५ टक्के उपस्थिती नोंदवली गेली. मात्र, दोन्ही सत्रांमध्ये गणित विषयाच्या प्रश्नांनी विद्यार्थ्यांची सर्वाधिक कसोटी घेतल्याच्या प्रतिक्रिया उमेदवारांनी दिल्या.