Nashik Crime News : चोरट्यांकडून महिलांच्या दागिन्यांची लुट; अडीच लाखांचे दागिने लंपास

Crime
Crimeesakal

Nashik Crime News : शहरात दुचाकीवरून आलेल्या भामट्याने एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेली तर दुसर्या घटनेत महिलेच्या पर्समधील दागिने तर एका वृद्धेच्या हातातील बांगड्या भामट्यांनी हातेाहात लंपास केल्याचा प्रकार घडला. (Jewelry worth two and half lakh stolen by thief nashik crime news)

या तीन घटनांमध्ये भामट्यांनी तब्बल अडीच लाखांचा ऐवज चोरून नेला असून, याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ममता प्रकाश काले (रा. गजपंथ सोसायटी, दिंडोरी रोड, म्हसरुळ) यांच्या फिर्यादीनुसार, गेल्या शनिवारी (ता. १५) रात्री सव्वा नऊच्या सुमारास त्या वैदूवाडीसमोरून पायी जात होत्या.

त्यावेळी दुचाकीवरून दोघा भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील ३० हजार रुपयांची सोन्याची चैन बळजबरीने खेचून नेत पोबारा केला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक आर.जी. घडवजे हे तपास करीत आहेत.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Crime
Atiq Ahmed Killed : तो गुड्डू मुस्लिम नव्हेच! नाशिकमध्ये STF ने ताब्यात घेतलं तो नेमका कोण? जाणून घ्या सविस्तर

त्याचप्रमाणे, शितल सुरेश बच्छाव (रा. रत्नपूजा अपार्टमेंट, वडाळा-पाथर्डीरोड) या गेल्या शुक्रवारी (ता. १४) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मेनरोड परिसरात आल्या होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील १ लाख ६० हजार रुपयांची सोन्याची चैन लंपास केली.

तर, साहिल सुधाकर देवरे (रा. राधेकृष्ण रो हाऊस, पाथर्डी फाटा) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची आजी गेल्या ११ तारखेला दुपारी साडेबाराच्या सुमारास जुने सीबीएस परिसरात असताना अज्ञात संशयितांनी त्यांच्या हातातील ६० हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगड्या चोरून नेल्या. या दोन्ही घटनांप्रकरणी सरकारवाडा पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime
Nashik Crime News : चांदीचा गणपतीचे दागिने चोरण्याचा प्रयत्न; वॉचमन गंभीर जखमी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com