धुळे टुडे २ साठी...
---
फोटो-NSK26H33682
धुळे : राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद पटकाविणाऱ्या महाराष्ट्र संघात सहभागी जिजामाता कन्या विद्यालयाच्या खेळाडू वंशिका शिंदे, चांदणी गिरी यांच्यासह प्राचार्य अपर्णा पाटील व इतर मान्यवर.
---
फुटबॉलच्या नॅशनल चॅम्पियन्समध्ये
जिजामाता विद्यालयाच्या दोन खेळाडू
---
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २७ : गोवा राज्य स्टुडंट गेम्स फेडरेशनतर्फे गोव्यात झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावून राष्ट्रीय विजेतेपद मिळवले. या विजेत्या संघात धुळ्यातील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या जिजामाता कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या दोन खेळाडूंचा समावेश होता. ही बाब धुळेकरांसाठी अभिमानास्पद ठरली आहे.
जिजामाता कन्या विद्यालयाच्या प्राचार्य अपर्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाच्या वंशिका मनोहर शिंदे व चांदणी सुनिल गिरी या दोन विद्यार्थिनींची फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाली होती. या स्पर्धेसाठी संघाचे मार्गदर्शक व क्रीडा प्रशिक्षक मोहशिम शेख यांनी दोन्ही खेळाडूंना विविध डावपेच, मैदानी कौशल्य शिकविले आणि सातत्यपूर्ण सराव करून घेतला. शालेय स्तरावर एम. एम. येवलेकर, एस. पी. देवरे व अभिजित पाटील यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत देशभरातून विविध राज्यांचे संघ सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी उत्कृष्ट सांघिक खेळ, दमदार बचाव आणि आक्रमक चालींच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांवर मात करत अंतिम विजय खेचून आणला. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन माजी आमदार कुणाल पाटील, अश्विनी पाटील, रायबा पाटील, सर्व पदाधिकारी प्राचार्य सौ. पाटील यांनी दोन्ही विद्यार्थिनी व त्यांचे मार्गदर्शक शेख यांचे कौतुक केले.
---