Jindal Fire Accident : अन्‌ पोलिस, सिव्हिल यंत्रणा झाली सज्ज

Jindal Accident News
Jindal Accident Newsesakal

नाशिक : गेल्या ऑक्टोबर महिन्यात नाशिक-औरंगाबाद रोडवरील मिरची चौफुलीवर खासगी बस आगीच्या घटनेनंतर ज्या त्रुटी प्रकर्षाने आढळून आल्या, त्यापासून धडा घेत आजच्या जिंदाल कंपनीतील आगीच्या घटनेत दूर करण्याचा प्रयत्न पोलिस आणि आरोग्य यंत्रणेने केल्याचे दिसून आले.

आगीची माहिती मिळताच पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे पथक जिल्हा रुग्णालयात ठाण मांडून होते. जिल्हा रुग्णालयातही जखमी रुग्णांच्या उपचारासाठीची सज्जता बाळगतानाच डॉक्टरांसह अधिकारी रुग्णालयात उपस्थित होते. ( Jindal Fire Accident alert police department and doctors nashik fire accident news)

Jindal Accident News
Malegaon News : शिवमहापुराण कथेमुळे आठवडेभरात 10 हजारावर बेलाच्या रोपांची विक्री

पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांच्यासह सरकारवाडा, मुंबई नाका, भद्रकाली पोलीस ठाण्यांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. १०८ रुग्णवाहिका तातडीने जिंदाल कंपनीच्या दिशेने धावल्या.

जिल्हा रुग्णालयात तात्काळ आपत्पाकालिन परिस्थितीची हाताळणी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले. अतिदक्षता विभाग सज्ज करण्यात आला.

तसेच, तज्ज्ञ डॉक्टरांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपस्थित होण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. सायंकाळपर्यंत या दोन्ही यंत्रणा आपआपल्या नियोजनानुसार ठाण मांडून होत्या.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

Jindal Accident News
Jalgaon News : वर्षाचा पहिलाच सूर्योदय अन्‌ घरचा दिवा विझला

अनुभवातून धडा

गेल्या ८ ऑक्टोबरला पहाटे पावणे पाचच्या सुमारास नाशिक-औरंगाबाद रोडवरील मिरची चौफुलीवर खासगी बसला अपघात झाला. यात बसने पेट घेतल्याने १२ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

या घटनेदरम्यान पोलिसांसह रुग्णवाहिका व अग्निशमन बंबांना पोहोचण्यासाठी विलंब झाला होता. त्यामुळे प्रवाशांना वेळीच मदत मिळू शकली नव्हती. याच अनुभवातून धडा घेत आजच्या घटनेच्या पाश्‍र्वभूमीवर आपत्कालीन यंत्रणेची सज्जता दिसून आली.

Jindal Accident News
Crime News : मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी देणारा आरोपी अटकेत....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com