दोंडाईच्यात रोजगार मेळावा

दोंडाईच्यात रोजगार मेळावा
Published on: 
धुळे : टुडे पान २ साठी... --- दोंडाईच्यात २० नोव्हेंबरला रोजगार मेळावा दहावी ते एम.टेक. पर्यंतच्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. १५ : दोंडाईचा परिसरातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी दोंडाईचास्थित श्री जयकुमार रावल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि सीआयआय–मॉडेल करिअर सेंटर (एमसीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने २० नोव्हेंबरला एका रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे पणन व राजशिष्टाचारमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्‍घाटन होईल. संस्थेचे अध्यक्ष सरकारसाहेब रावल अध्यक्षस्थानी असतील. मंत्री रावल यांच्या विशेष प्रयत्नांमुळे स्थानिक तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळण्याची संधी मिळणार आहे. या मेळाव्यात ५० हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. सकाळी नऊ ते दुपारी तीनपर्यंत चालणाऱ्या या मेळाव्यात दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिंग, डी.फार्मसी, बी.फार्मसी, एमबीए, एम.ई. आणि एम.टेक. या शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार सहभागी होऊ शकतात. इच्छुकांनी अद्ययावत बायोडाटा, आधारकार्ड, पॅनकार्ड, गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्र व पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत आणावेत. उपक्रमासाठी सीआयआयचे सेंटर व्यवस्थापक सागर शिरसाठ, पुणे येथील स्टेट हेड निर्मल पाटील, एच.आर. रामकृष्ण सोनवणे, सहसचिव आर. टी. गिरासे, सचिव सी. एन. राजपूत, सहसचिव डी. एन. जाधव, सामान्य प्रशासन सचिव ललितसिंह गिरासे यांचे सहकार्य होत असून, प्राचार्य डॉ. डी. एम. पटेल, प्राचार्य एम. डी. पाटील, उपप्राचार्य बी. डी. गिरासे, उपप्राचार्य के. डी. सोनार, टीपीओ प्रा. आर. पी. चौधरी, प्रा. एस. एस. शाह परिश्रम घेत आहेत. परिसरातील जास्तीत जास्त युवकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.