आमिषाने तरुणाला लुटले

आमिषाने तरुणाला लुटले
Published on: 
धुळे ः टुडे १ साठी -- नोकरीच्या आमिषाने तरुणाला लुटले -- पिस्तूल, चाकूचा धाक; सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. ७ : इन्स्टाग्रामवर औषध पॅकिंगच्या नोकरीची जाहिरात, तर फेसबुकवर पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून बिहारमधील तरुणांसह चौघांना अजनाळे- कुसुंबा (ता. धुळे) रस्त्यालगत डोंगराजवळील निर्जनस्थळी बोलावून बेदम मारहाण करीत पिस्तूल, चाकू व लोखंडी रॉडचा धाक दाखवून लुटल्याची घटना मंगळवारी (ता. ६) घडली. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात अजनाळे (ता. धुळे) येथील पाच जणांसह सहा ते सात अनोळखी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. विजयकुमार जगन पासबान (रा. बेलका, जि. वैशाली, बिहार) याने इन्स्टाग्राम रील्सवर औषध पॅकिंगच्या कामाची जाहिरात पाहिल्यानंतर संबंधितांशी संपर्क साधला. त्याला कामाचे आमिष दाखवून अजनाळे- कुसुंबादरम्यान डोंगराजवळील निर्जनस्थळी बोलावण्यात आले. तसेच दत्तात्रय अशोक शिंदे यालाही फेसबुकवरील व्हिडिओद्वारे पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्याने संबंधितांशी संपर्क साधल्यानंतर ९१ हजार ५०० रुपये घेऊन घटनास्थळी बोलावण्यात आले. विजयकुमार पासबान, त्यांचे चुलत भाऊ पवनकुमार रामलाल पासबान, मित्र अंकीतकुमार प्रमोद पासबान आणि दत्तात्रय शिंदे हे मंगळवारी सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी पवन भोसले पवार, इशांत सुभाष पवार, रवी ऊर्फ रव्या फोपा भोसले, आदित्य साहेब भोसले, गोरख किरसिंग भोसले (सर्व रा. अजनाळे, ता. धुळे) व साथीदारांनी चौघांना मारहाण केली. नंतर पिस्तूल, चाकू व लोखंडी रॉडचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. त्यांच्याकडील रोख रक्कम हिसकावून घेतली. तसेच फोन- पेच्या माध्यमातून काही रक्कम स्वतःच्या खात्यावर वर्ग करून घेतली. त्यानंतर कोणतेही काम न देता आणि पैसे दुप्पट न करता संशयित वाहनासह पसार झाले. विजयकुमार पासबान यांच्या फिर्यादीनुसार धुळे तालुका पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com