Joha Rice On Diabetes : ईशान्य भारतातील जोहा तांदूळ मधुमेह व्यवस्थापनात पौष्टिक; शास्त्रज्ञांचा शोध

Joha Rice from North East India Nutrition in Diabetes Management nashik news
Joha Rice from North East India Nutrition in Diabetes Management nashik newsesakal

Joha Rice On Diabetes : इन्स्टिट्यूट ऑफ ॲडवान्सड स्टडी इन सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधील शास्त्रज्ञांनी ईशान्य भारतातील सुगंधी जोहा तांदळाच्या पौष्टिक गुणधर्मांचा शोध लावला. (Joha Rice from North East India Nutrition in Diabetes Management nashik news)

राजलक्ष्मी देवी आणि परमिता चौधरी यांनी जोहा तांदळाच्या पौष्टिक गुणधर्माचा शोध लावला. जोहा रक्तातील ग्लुकोज कमी करण्यासाठी आणि मधुमेह रुग्णांमधील मधुमेह रोखण्यासाठी प्रभावी असल्याचे सिद्ध झाले.

जोहा तांदळाचा आहारात समावेश असलेल्यांमध्ये मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा प्रादूर्भाव कमी आहे, असा पारंपारिक दावा केला जात होता. मात्र त्यासाठी वैज्ञानिक प्रमाणीकरण आवश्यक होते.

त्यासंबंधाने संशोधन करण्यात आले. इन विट्रो प्रयोगशाळेतील विश्‍लेषणाद्वारे शास्त्रज्ञांना लिनोलिक ऍसिड (ओमेगा-६) आणि लिनोलेनिक (ओमेगा-३) ॲसिड ही दोन अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड आढळली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Joha Rice from North East India Nutrition in Diabetes Management nashik news
Black Rice Benefits : वाढत्या मधुमेहाची काळजी वाटतेय? मग काळा तांदूळ खा, नक्की फरक पडेल!

ही अत्यावश्यक फॅटी ऍसिडस् (जी मानव निर्माण करू शकत नाही) विविध शारीरिक स्थिती राखण्यात मदत करू शकतात. ओमेगा-३ फॅटी ॲसिड मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि कर्करोग यासारख्या अनेक चयापचय संबंधित आजारांना प्रतिबंध करते, असेही शास्त्रज्ञांना आढळले.

मोठ्याप्रमाणात वापरल्या जाणाऱ्‍या बिगर सुगंधी तांदळाच्या तुलनेत सुगंधित जोहा तांदूळमध्ये ओमेगा-६ आणि ओमेगा-३ हे अधिक संतुलित प्रमाणात आहे, असे आढळले. योग्य आहार राखण्यासाठी मानवाला आवश्यक असलेले ओमेगा-६ आणि ओमेगा-३ या आवश्यक फॅटी ॲसिडचे (ईएफए) प्रमाण साधारणतः एक इतके आहे. त्यांनी जोहा तांदळाचा वापर राइस ब्रॅन तेल हे एक पेटंट उत्पादन बनवण्यासाठी केला आहे, जे मधुमेह व्यवस्थापनात प्रभावी आहे, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

याशिवाय जोहा तांदूळ अनेक अँटिऑक्सिडंट्स, फ्लेव्होनॉइड्स आणि फेनोलिक्सने समृद्ध आहे. त्यामध्ये ओरिझानॉल, फेरुलिक ॲसिड, टोकोट्रिएनॉल, कॅफीक ॲसिड, कॅटेच्युइक ॲसिड, गॅलिक ॲसिड, ट्रायसिन सारखी अनेक बायोएक्टिव्ह संयुगे आहेत. ज्यात अँटिऑक्सिडंट, हायपोग्लाइसेमिक आणि कार्डिओ-प्रोटेक्टिव्ह गुणधर्म आहेत, असे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे.

Joha Rice from North East India Nutrition in Diabetes Management nashik news
Diabetes च्या रूग्णांसाठी 10 बेस्ट ड्रिंक ऑप्शन्स, रोज प्या अन् कायम ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com