कृषी विभागाकडे बियाणे पडून

कृषी विभागाकडे बियाणे पडून
Published on: 
ज्वारीचे वाण मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी फिरवली पाठ निमगूळ, ता. १९ ः प्रशासनातर्फे दर वर्षी होणारी दिरंगाई, पारंपरिक बियाणे ऑनलाइन प्रक्रिया यामुळे शिंदखेडा तालुक्यात कृषी विभागाच्या अनुदानित ज्वारीच्या बियाण्याकडे शेतकरी वर्गाने पाठ फिरवली असून, कृषी विभागाकडे एक हजार अनुदानित ज्वारीच्या बॅग पडल्या असून, शिंदखेडा तालुक्यातून फक्त २६ शेतकऱ्यांनी अनुदानाचा लाभ घेतला आहे. तालुक्यात ज्वारीच्या (दादर) पिकाची कोरडवाहू क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने पेरणी दसऱ्याला सुरवात केली जाते. त्या वेळी शासनाकडून अनुदानित ज्वारी उपलब्ध नसते ज्यांनी कोरडवाहू शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, त्यांचे ज्वारीचे पीक आजच्या स्थितीत चांगल्याप्रकारे झाले आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे चाऱ्याला उपयोग होईल, या हेतूने शेतकऱ्यांनी उशीर न करता पेरणी केली असून, बियाणे उशिरा येत असल्याने बियाण्याकडे शेतकरी वर्गाने पाठ फिरवली आहे. याविषयी कृषी विभागाकडून माहिती घेतली असता शासनाच्या निर्णयानुसार तालुक्यातील शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पाठविली होती तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून बियाण्यांची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली होती. तरीही तालुक्यातून अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे कृषी विभागाने सांगितले. शासन स्तरावर कृषी विभागाने यात सुधारणा करावी, अनुदानित बियाणे वेळेत उपलब्ध करावे, ज्वारीचे वाण शेतकऱ्यांना द्यावे, अशी मागणी होत आहे. कृषी विभागाकडे अनुदानित ज्वारीचे बियाणे उपलब्ध असून, तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी सुधीर ईशी यांनी केले आहे. ............. कोट शेतकऱ्यांनी सातबारा घेऊन ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करावी. अनुदानित बियाणे उपलब्ध आहे तरी तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा - सुधीर ईशी, तालुका कृषी अधिकारी, शिंदखेडा ...... कोरडवाहू क्षेत्रात पेरणी लवकर करावी लागते. शासनाकडून वेळेत बियाणे मिळत नसल्याने ऑनलाइन प्रक्रियेत भाग घेत नाही. यशवंत बागल, प्रगतिशील शेतकरी, निमगूळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.