NSK26H34973
जळगाव : मुला-मुलींचे बालगृहात दीपोत्सवाचे उद्घाटन करताना मान्यवर.
--------
बालगृहातील चिमुरड्यांच्या
चेहऱ्यावर फुलले हास्य
दीपोत्सवात विविध कार्यक्रम उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १३ : जिल्हा परीविक्षा आणि अनुरक्षण संघटना संचलित, मुला-मुलींचे बालगृहात दाखल असलेल्या अनाथ निराथार, आश्रित, वाट चुकलेल्या बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणे, त्यांच्या आयुष्यात आशेचा दीप प्रज्वलित करणे या हेतूने दिवाळी कार्यक्रम घेण्यात आला.
बालगृहातील बालकांची दिवाळी आनंदात पार पाडावी, यासाठी बालगृह अधिक्षक रविकिरण अहिरराव यांच्या प्रयत्नांनी वसुबारसपासून ते भाऊबीजपर्यंतच्या सर्व सांस्कृतिक उपक्रम झाले. दिवाळीचे औचित्य साधून मुला-मुलींना कपडे, बूट, मिठाई, फराळ, भेटवस्तू आणि विविध आवश्यक साहित्य तसेच आकर्षक फटाके वाटप करण्यात आले. यावेळी मुलां-मुलींनी फटाके फोडण्याचा मनसोक्त आनंदा साजरा केला. बालगृहातील परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली. आकाश कंदील, फुलमाळा, रंगीबेरंगी रांगोळ्यांना संस्थेचा परिसर सुशोभित करण्यात आला होता.
न्यायाधीश (वर्ग १) एस. व्ही. खोंगल, विधी सेवा प्राधिकरण सचिव एस. एन. बुद्रुक, दिवाणी न्यायाधीश श्री. वाळके, दाते सुनंदा पटेल. बालगृह अधीक्षक आहिरराव, संस्थेचे मानद सचिव सुनील पाटील, बालगृहातील कर्मचारी उपस्थित होते.