रोहित पठारे हत्याकांडातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा द्या,पत्नीला शासकीय नोकरी द्या!

रोहित पठारे हत्याकांडातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा द्या,पत्नीला शासकीय नोकरी द्या!
Published on: 
YEO26B27536 वैजापूर : रोहित पठारे या दलित युवकाच्या हत्याकांडातील सर्व आरोपींना कठोर शिक्षा द्यावी या मागणीचे निवेदन अधिकाऱ्यांना देताना महेंद्र पगारे व पदाधिकारी. ----------------- ३०-२ रोहित पठारे हत्येप्रकरणी दोषींना कठोर शिक्षा द्या पत्नीला नोकरी द्या ः महेंद्र पगारे सकाळ वृत्तसेवा येवला, ता.१६ : वैजापूर येथील रोहित पठारे हत्याकांडातील उर्वरित आरोपींना तातडीने अटक करून सर्वांना कठोर शिक्षा द्यावी तसेच पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी रोहित पठारे यांच्या पत्नीला शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी भीमशक्तीचे नाशिक जिल्हाध्यक्ष महेंद्र पगारे यांनी केली. राज्यसभेचे खासदार तथा माजी समाजकल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशानुसार पगारे यांनी सहकाऱ्यांसोबत वैजापूर येथे रोहित पठारे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. विविध मागण्यांचे लेखी निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले. वैजापूर येथे झालेल्या या भेटीदरम्यान रोहित पठारे यांच्या आई-वडिलांसह पत्नी व नातेवाइकांशी पगारे यांनी संवाद साधत घटनेची माहिती घेतली. छत्रपती संभाजीनगरचे उपजिल्हाधिकारी अरुण जऱ्हाड, वैजापूरचे तहसीलदार सुनील सावंत तसेच समाजकल्याण विभागाचे अधिकारी यांनीही पीडित कुटुंबाची भेट घेतली. शासनातर्फे कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात आली. उपजिल्हाधिकारी अरुण जऱ्हाड तसेच उपविभागीय पोलिस अधिकारींना भिमशक्तीतर्फे लेखी निवेदन देण्यात आले. भीमशक्तीचे तालुकाध्यक्ष विजय घोडेराव, कार्याध्यक्ष बाळासाहेब आहिरे, तालुका उपाध्यक्ष विनोद त्रिभुवन, तालुका सचिव विधाता आहिरे, संघटक विजय पगारे, प्रशांत वाघ, राजाभाऊ आहिरे, युवराज पगारे, नितीन वाव्हुळ, सौ. कांता वाव्हुळ, वैजापूरचे युवा नेते राजवीर त्रिभुवन,आरपीआयचे तालुकाध्यक्ष साहेबराव पडवळ, बाळासाहेब त्रिभुवन, संदीप गायकवाड, लहानू त्रिभुवन, बसपाचे नेते बाबासाहेब पगारे आदी उपस्थित होते. -----------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.