नाशिक- येथील श्री काळाराम मंदिर देवस्थान ट्रस्ट अध्यक्षपदी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश श्रीमती आर. एन. पांढरे यांची मंगळवारी (ता. ८) नियुक्ती करण्यात आली. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात मंदिराच्या पुजाऱ्यांच्या मानधनासंदर्भात सुरू असलेल्या याचिकेवर युक्तिवाद होऊन १५ तारखेपर्यंत सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.