शेतीकाम, टेलरिंगमधून ज्योती शेलार यांनी शिक्षणात आणली लक्ष्मी!

Inspiring Story
Inspiring Storyesakal

येवला (जि. नाशिक) : ‘तू खुद को बदल, तू बोलेगी, मूह खोलेगी, तभी तो जमाना बदलेगा…’ असे म्हटले जाते. या ओळी सार्थ ठरवत आज महिलांनी सर्व क्षेत्रात आपली जागा निर्माण केली आहे. कर्तृत्व, नेतृत्व, जबाबदारी पेलवत स्वप्न उराशी बाळगले की कुठलेच काम अशक्य नाही, हे सिद्ध केले आहे ,विखरणी येथील लक्ष्मी इंग्लिश मीडियम स्कूलच्या संचालिका तथा प्राचार्य ज्योती शेलार यांनी… सर्वसामान्य शेतकऱ्याची सुन, घरात टेलरिंग व्यवसायपासून सुरू झालेला प्रवास आज एका शाळेच्या दीपस्तंभापर्यंत पोहोचला असून, तो इतरांसाठी आदर्शवत असाच आहे.

आताच्या काळात असे एकही क्षेत्र नाही जिथे महिला काम करत नाही. चाकोरीबद्ध जीवन झुगारत काहीतरी वेगळे करण्यासाठी बाहेर पडलेल्या महिलांनी स्वत:ला सिद्ध करुन दाखवले असून, अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाची सून, महिला शिलाई काम करणारी टेलर ते यशस्वी संस्थाचालक असा प्रवास करणाऱ्या ज्योतीताई यांनी... विखरणीसारख्या डोंगराळ भागात सून म्हणून आलेली एक भाजी विक्रेत्याची मुलगी, शेतात काम करून गावातील महिलांचे कपडे शिवणारी टेलर काम करणारी गृहिणी, काळाच्या ओघात संघर्षातून संस्थाचालक झाली हा निश्‍चितच महिलांसाठी गौरवास्पद क्षण आहे.

Inspiring Story
Women Day : महिलांच्या सुरक्षेसाठीचे 5 अ‍ॅप्स, इंटरनेटशिवाय वापरता येणार

ज्योती शेलार यांचे शिक्षण दिंडोरी (Dindori) येथे बीएपर्यंत झाले. पितृछत्र लहानपणीच हरवल्याने आई भाजीपाला विकण्याचा व्यवसाय करत असल्याने बालपणापासून गरीबीचे चटके सहन करत जीवनाचा प्रवास झाला. विखरणी येथील गाडी खरेदी- विक्री करणारे व्यावसायिक मोहन शेलार यांच्याशी त्यांचा विवाह झाला. पतीकडील देखील परिस्थिती जेमतेमच असल्याने शेतात काम करणे, संसाराला हातभार म्हणून रात्रीचे शिवणकाम (Tailoring) करणे असा दिनक्रम सुरू होता.

Inspiring Story
International Women’s Day : बॉलीवूडची पहिली स्टंटवुमन माहितीये?

कुटुंबातील कोणताही राजकीय (Political) आणि शैक्षणिक वारसा नसताना पतींनी खंडूमामा शेलार नावाने बहुउद्देशिय संस्था स्थापन केली. सुदैवाने २०१० साली महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नवीन इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यासाठी ऑनलाइन प्रस्ताव मागितले. काहीतरी करण्याची जिद्द असल्याने ज्योती शेलार यांनी आग्रहाने इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा प्रस्ताव दाखल केला. कष्टाने साकारत असलेल्या काही गोष्टींना नशिबाची साथ असावी लागते हे खरंच… ऑनलाइन प्रस्तावाला शासनाने मान्यता दिली आणि लक्ष्मी इंग्लिश मिडीयम स्कूल विखरणीसारख्या ग्रामीण भागात सुरू झाले.

Inspiring Story
Womens Day 2022: बलात्कारासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये कोणत्या शिक्षा?

2011 साली अवघे 13 मुले घेऊन शाळेचा झालेला प्रवास त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. 13 मुलांवर सुरू झालेली शाळा संथ प्रवास करत, कोरोनासारख्या संकटातून सावरत आज 267 मुलांना शिक्षण देत असून, शाळेचे संपूर्ण व्यवस्थापन स्वतः ज्योतीताई सांभाळत आहे. पती मोहन शेलार सध्या पंचायत समिती (Panchayat Samiti) सदस्य असल्याने पूर्णवेळ राजकारण व समाजकारणात व्यस्त असतात. असे असताना ग्रामीण भागातील दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून ज्योतीताईंनी या शाळेची ओळख निर्माण केली आहे.

Inspiring Story
Women's Day : 17 अधिकार जे प्रत्येक माहिलेला माहिती असायलाच हवेत!

"शेतकरी, गृहिणी, महिला टेलर असा सामान्य जीवनाचा प्रवास करत असताना उराशी स्वप्न मोठी होती. समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द होती. आर्थिक परिस्थिती बेताची असताना हे साकारण शक्य नव्हते. परंतु, पती डॉ. मोहन शेलार यांनी महिला म्हणून काम करायला स्वातंत्र्य दिले. प्रत्येक सामाजिक कामात भक्कमपणे पाठीशी उभे राहिले म्हणून आज मला उराशी बाळगलेली स्वप्न पूर्ण होत आहे."

- ज्योती मोहन शेलार, अध्यक्ष, लक्ष्मी इंग्लिश मिडीयम पब्लीक स्कूल, विखरणी

Inspiring Story
Women's Day : 17 अधिकार जे प्रत्येक माहिलेला माहिती असायलाच हवेत!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com