नाशिक- शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नयनतारा निवासस्थानासमोर मशाल पेटवून आक्रमक आंदोलन केले. एक तास आंदोलन केल्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी फोनवर चर्चा झाली. त्यानंतर कोकाटे यांना भेटण्यासाठी बच्चू कडू कार्यकर्त्यांसह सिन्नरला रवाना झाले.