पान-२ मेन करणे
----------------
LKH26B05118
कादवा कार्यस्थळ ः कादवा सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदिपनप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, खासदार भास्कर भगरे, प्रांताधिकारी आप्पासाहेब शिंदे, अध्यक्ष श्रीराम शेटे आदी.
---------------------
कादवालाच ऊस पुरवठा करा : श्रीराम शेटे
बॉयलर अग्निप्रदीपन उत्साहात ः जिल्हाधिकाऱ्यांकडून कारखान्याचे कौतुक
सकाळ वृत्तसेवा
लखमापूर, ता.१७ : शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत कादवा सहकारी साखर कारखान्याने आजपर्यंत ऊस उत्पादकांना जिल्ह्यात चांगला भाव देण्याची परंपरा कायम राखली आहे. यापुढेही ती कायम ठेवणार असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करून कादवा कारखान्यालाच ऊस पुरवठा करावा, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी केले.
---------------
कादवा सहकारी साखर कारखान्याच्या ५० वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला, त्यावेळी शेटे अध्यक्षस्थानावरून बोलत होते. बाजार समिती सभापती प्रशांत कड, दत्तात्रेय पाटिल, माणिकराव पाटिल आदिसह संचालक व्यासपीठावर उपस्थित होते. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी जिल्ह्यात एकमेव सहकार तत्वावरील कारखाना सुरु असल्याबाबत संचालक मंडळास धन्यवाद देत कारखान्याच्या प्रगतीसाठी प्रशासनाकडून सर्वोतपरी सहकार्य करण्यात येईल असे सांगितले.
------
श्रीराम शेटे म्हणाले,‘ कादवाने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्य दिले आहे. चांगला भाव व वेळेत एफआरपी अदा केली आहे. कारखान्याचे विस्तारीकरण प्रगतिपथावर असून लवकरच काम पूर्ण होऊन पूर्ण क्षमतेने गाळप करण्यात येईल. कार्यक्षेत्रासह गेटकेन क्षेत्रात सुमारे ११ हजार हेक्टर उसाची नोंद झाली असून, गळीत हंगामासाठी पुरेशा ऊसतोड कामगारांची भरती करण्यात आली आहे. हंगामपूर्व तयारी पूर्ण झाली असून, कारखाना गाळपासाठी सज्ज असल्याचे शेटे यांनी सांगितले.
माजी आमदार अमोल मिटकरी यांनी कादवा कारखान्याचे कामकाज सहकार क्षेत्रासाठी आदर्शवत असल्याचे नमूद केले. मंत्री नरहरी झिरवाळांनी तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करताना लवकरच दुष्काळ जाहीर होईल. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. शेती वाचविण्यासाठी पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. नादुरुस्त रस्त्यांवरील खड्डे भरून दुरुस्ती करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मातेरेवाडी येथील राजेंद्र भास्कर खराटे, चिंचखेड येथील कैलास विश्वनाथ झेंडफळे, लखमापूर येथील मनोज अशोक दळवी, दिंडोरी येथील नितीन सुधाकर देशमुख आणि हातनोरे येथील अशोक पोपट बोरस्ते या ऊस उत्पादकांच्या हस्ते सपत्नीक बॉयलर पूजन करण्यात आले. विविध मान्यवर, कारखान्याचे संचालक, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि कर्मचारी उपस्थित होते. अशोक शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. संचालक सुकदेव जाधव यांनी आभार मानले.
------------------