कादवा सहकारी साखर कारखान्याकडे ६ लाखांची ठेव सुपूर्द

कादवा सहकारी साखर कारखान्याकडे ६ लाखांची ठेव सुपूर्द
Published on: 
कादवा खरेदी- विक्री संघाला नवसंजीवनी कादवा सहकारी साखर कारखान्याकडे सहा लाखांची ठेव सुपूर्द सकाळ वृत्तसेवा लखमापूर, ता.११ ः बंद असलेला आणि अवसायनात जाण्याच्या उंबरठ्यावर पोहोचलेला कादवा खरेदी-विक्री संघ आता पुन्हा एकदा विकासाच्या वाटेवर मार्गक्रमण करू लागला आहे. कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांच्या दूरदृष्टीपूर्ण पुढाकारामुळे या सहकारी संस्थेला नवसंजीवनी मिळाली असून, नवनिर्वाचित कार्यकारिणीने वर्षभरातच आर्थिक सक्षमतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. श्रीराम शेटे यांनी संघाचे अस्तित्व टिकविण्यासाठी विशेष पुढाकार घेतला. कादवा खरेदी-विक्री संघाच्या सर्व पदाधिकारी व संचालकांनी कादवा कारखान्याला भेट देत श्री. शेटे यांच्याकडे सहा लाख रुपयांचा धनादेश ठेव स्वरूपात सुपूर्द करण्यात आला. या निर्णयामुळे दोन्ही सहकारी संस्थांमधील आर्थिक सहकार्याला बळ मिळणार आहे. श्री. शेटे म्हणाले,‘ कादवा खरेदी-विक्री संघ गेल्या पंधरा वर्षांपासून बंद होता. संघाकडे दोन एकर जमीन आणि गोदामासारखी मालमत्ता उपलब्ध असतानाही संस्था निष्क्रिय झाली होती. संस्था वाचविण्यासाठी योग्य मार्ग काढून निवडणूक बिनविरोध करण्यात आली. विविध क्षेत्रांतील योग्य व्यक्तींची निवड करून त्यांना संस्थेच्या विकासासाठी काम करण्याची संधी दिली. नवनिर्वाचित कार्यकारिणीने कादवा कारखान्याकडे सहा लाख रुपयांची ठेव ठेवली आहे. यामुळे दोन्ही संस्थांना निश्चितच फायदा होईल. कादवा खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष दत्तू गटकळ, उपाध्यक्ष योगेश संधान, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब जाधव, कादवा साखर कारखान्याचे संचालक मधुकर गटकळ, रघुनाथ जाधव, संजय कावळे, दिलीप कावळे, संतोष कथार, राहुल जाधव, महेश शेटे, विनायक बस्ते, बरकू सूर्यवंशी, उषाताई उगले, कमल थोरमिसे, सरला सवन्द्रे, अशोक भालेराव, पंढरीनाथ पगार, शरद जाधव, छब्बू मटाले, सचिव किशोर माळोंदे आदी उपस्थित होते. -------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.