कैलास जैन यांना पुरस्कार

कैलास जैन यांना पुरस्कार
Published on: 
धुळे : टुडे पान १ साठी... -- फोटो क्रमांक : 34329 नवी दिल्ली : हस्ती ग्रुप ऑफ स्कूल्सचे अध्यक्ष कैलास जैन यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा व्हिजनरी एज्युकेशन लीडर अवॉर्ड प्रदान करताना आयएफआईपी, यूकेचे संस्थापक बेन गजियन आणि टॅलेंट एजच्या असोसिएट डायरेक्टर रितू चोप्रा. -- कैलास जैन यांना व्हिजनरी एज्युकेशन लीडर पुरस्कार -- ग्रामीण भागातील शिक्षणातील कार्याबद्दल गौरव सकाळ वृत्तसेवा धुळे, ता. २ : दोंडाईचा परिसरातील ग्रामीण भागात आधुनिक तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विस्तार करणाऱ्या हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलित हस्ती ग्रुप ऑफ स्कूल्सचे अध्यक्ष कैलास चंद्रावती कांतीलाल जैन यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘व्हिजनरी एज्युकेशन लीडर ॲवॉर्ड’ प्रदान करण्यात आला आहे. ‘एज्युकेशन वर्ल्ड इंडिया स्कूल रँकिंग अवॉर्ड्स २०२६-२७’ अंतर्गत हा सन्मान देण्यात आला. नवी दिल्लीतील हॉटेल पुलमन एरोसिटी येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात आयएफआईपी, यूकेचे संस्थापक बेन गजियन आणि टॅलेंट एजच्या असोसिएट डायरेक्टर रितू चोप्रा यांच्या हस्ते कैलास जैन यांनी हा पुरस्कार स्वीकारला. विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतींचा प्रभावी वापर व तंत्रज्ञानाधारित शिक्षण देण्याच्या त्यांच्या कार्याची दखल घेत हा गौरव करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक, मानसिक व सामाजिक विकास साधत के-१२ शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. त्यांच्या नेतृत्वात संस्थेला यापूर्वी ६० हून अधिक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि हस्ती ग्रुप परिवाराकडून कैलास जैन यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.