नामपूर- दरेगाव (ता. बागलाण) येथे एका आदिवासी शेतमजुराचा खून झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (ता. ११) उघडकीस आली. पतीच्या सततच्या मारहाणीला कंटाळून पत्नीनेच त्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक कबुली दिल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जायखेडा पोलिसांनी मृताच्या पत्नीला ताब्यात घेतले असून, खुनात अन्य कोणाचा सहभाग होता का, याचा तपास सुरू आहे.