अभिमानास्पद! बुद्धिबळ विश्वकरंडकासाठी नाशिकच्या कैवल्यची निवड

Kaivalya Nagare
Kaivalya NagareSakal
Updated on

नाशिक : जागतिक बुद्धिबळ संघटना (FIDE) यांच्‍यातर्फे ऑगस्‍टमध्ये १४ वर्षांखालील विश्‍वकरंडक (World Cup) स्‍पर्धा होणार आहे. या स्‍पर्धेसाठी नाशिकच्या कैवल्य नागरे (Kaivalya Nagare) याची भारतीय संघात निवड झाली. त्याने आंतरराष्ट्रीय स्‍तरावर देशाला पदक जिंकवून देण्याची अपेक्षा क्रीडाप्रेमींकडून व्‍यक्‍त होत आहे. Kaivalya Nagare selected for chess world cup Nashik

जागतिक बुद्धिबळ संघटना World Chess Federation (फिडे) व अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या All India Chess Federation मान्यतेने भारतीय महासंघाद्वारे राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा झाली. नुकत्याच या स्पर्धेसाठी राज्य आणि राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा झाली. राज्य निवडचाचणी स्पर्धेत खेळताना कैवल्यने नऊपैकी ८.५ डाव जिंकत राज्यात आपला दबदबा निर्माण केला. राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रचे नेतृत्व करताना कैवल्यने आपल्या आक्रमक चालींचा पवित्रा घेत विरोधकांना पराभूत केले. स्पर्धेत १४ वयोगटात ६४३ मुलांमध्ये आपल्या आक्रमक शैलीच्या बळावर ११ पैकी नऊ गुणांसह तृतीय स्थानावर झेप घेत गनिमीकाव्याने महाराष्ट्राला कांस्यपदक प्राप्त करवून दिले. सोबतच भारतीय संघात आपले स्थान निश्चित करताना नाशिकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. कैवल्यची आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या ‘फिडे ऑनलाइन रॅपिड वर्ल्ड कप कॅडेट्स ॲन्ड यूथ’ (१४ वर्षेआतील) (FIDE Online Cadets & Youth Rapid World Cup) स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला नाशिकमधील जिनिअस चेस ॲकॅडमीचे राष्ट्रीय बुद्धिबळ प्रशिक्षक ओंकार जाधव यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Kaivalya Nagare
PHOTO : नाशिक जिल्ह्यात वसलयं राज्यातील पहिले 'गुलाबी गाव'!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com