टिप : मुख्य अंक पान १ साठी
बाबू गोयकर 16042
हरी गोयकर 16043
भूषण करनर 16044
-----
नातवाला वाचविताना आजोबासह मामाचा मृत्यू
कजवाडे येथे मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या तिघांवर काळाचा घाला
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. ४ : मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या आजोबा, नातू आणि मामाचा पाझर तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. कजवाडे (ता. मालेगाव) गावानजीकच्या सातवडे पाझर तलावात रविवारी (ता. ४) दुपारी चारला ही हृदयद्रावक घटना घडली. नातू पाण्यात बुडत असल्याचे पाहून त्याला वाचविण्यासाठी आजोबा व मुलाने पाण्यात उडी घेतली. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तिघांचाही दुर्देवी मृत्यू झाला. बाबू गंगाराम गोयकर (वय ५४), हरी बाबू गोयकर (वय २८) आणि भूषण रघुनाथ करनर (वय १५, तिघे रा. कजवाडे) अशी मृतांची नावे आहेत.
कजवाडे येथील गोयकर कुटुंबाकडे सुमारे शंभर मेंढ्या आहेत. रविवारी बाबू गोयकर, त्यांचा मुलगा हरी आणि नातू (भाचीचा मुलगा) भूषण हे मेंढ्या धुण्यासाठी गावानजीकच्या सातवडे पाझर तलावावर गेले होते. तलावाच्या कडेला मेंढ्या धुत असताना भूषणचा अचानक पाय घसरला. तो खोल पाण्यात बुडू लागला. भूषण पाण्यात बुडत असल्याचे दिसताच त्याचे आजोबा बाबू आणि मामा हरी यांनी पाण्यात उडी घेतली. मात्र भूषणला वाचवताना दोघेही खोल पाण्यात बुडाले. तिघे बुडत असल्याचे मळगाव येथील एका नागरिकाच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ परिसरातील नागरिकांना माहिती दिली. ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेत तिघांना पाण्याबाहेर काढून मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिघांनाही मृत घोषित केले. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली.
----------
तीन पिढ्यांचा अंत
रात्री उशिरा कजवाडे येथील स्मशानभूमीत तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच कुटुंबातील तीन पिढ्यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने गोयकर व करनर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.