
Nashik Latest News: नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष असलेल्या जिल्हा अतिरिक्त न्यायाधीशांना उच्च न्यायालयाने पदावरून हटवण्याचे आदेश दिले होते. मंदिरातील दैनंदिन पूजा व प्रसादासाठी लागणाऱ्या खर्चास अध्यक्षांनी नकार दिल्यामुळे वंशपरंपरागत पुजारी सुशील पुजारी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे आता श्री काळाराम मंदिर संस्थानने उच्च न्यायालयात २० लाख रुपये जमा केले आहेत.