Ayodhya Ram Mandir : काळाराम संस्थानच्या ‘आनंद उत्सवा’स सामुहिक ढोल प्रदक्षिणेने प्रारंभ

अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या अयोध्येतील ऐतिहासिक सोहळ्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहे.
Ayodhya Ram Mandir : काळाराम संस्थानच्या ‘आनंद उत्सवा’स सामुहिक ढोल प्रदक्षिणेने प्रारंभ

Ayodhya Ram Mandir : अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या अयोध्येतील ऐतिहासिक सोहळ्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहे. या पार्श्‍वभूमीवर नाशिकच्या श्री काळाराम संस्थानतर्फे तीनदिवसीय ‘आनंद उत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.

उत्सवाच्या पहिल्या दिवशी स्वराज प्रतिष्ठानच्या ६५ ढोल वादकांनी श्रीरामास सामुहिक ढोल प्रदक्षिणा केली. (Kalaram Sansthan Anand Utsav started with group drumming nashik news)

श्री काळाराम संस्थानच्या तीनदिवसीय आनंद उत्सवास आजपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी सकाळी सात वाजता स्वराज प्रतिष्ठानच्या ६५ ढोल वादकांनी श्रीराम मंदिराच्या आवारात ढोल प्रदक्षिणा केली. त्यानंतर सकाळी दहा ते अकरा दरम्यान दया कुलकर्णी यांनी कीर्तन सेवा सादर केली तर दुपारी चार ते सात दरम्यान सरला चांडक माहेश्‍वरी व त्यांच्या महिला कलावंतांनी सुंदरकांड सादर करत उपस्थितांची वाहवा मिळविली.

या वेळी महिला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण व हनुमानाच्या वेशातील चिमुरड्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महोत्सवात उद्या (ता.२१)सकाळी सामुहिक श्री रामरक्षा व भीमरूपी पठण, कीर्तन श्रीराम स्वागत भजन होईल तर रात्री आठ ते दहादरम्यान स्थानिक कलावंत गीत रामायणाचा कलाविष्कार सादर करतील.

Ayodhya Ram Mandir : काळाराम संस्थानच्या ‘आनंद उत्सवा’स सामुहिक ढोल प्रदक्षिणेने प्रारंभ
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील सोहळ्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

श्री काळारामाच्या दर्शनासाठी गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गर्दी वाढली आहे. शनिवार, रविवार व सुटीच्या दिवशी या गर्दीत अधिक वाढ होत आहे. आज सकाळी दर्शनरांगा श्रीराम उद्यानापर्यंत पोचल्या होत्या. अनेकांनी दर्शनानंतर मंदिराच्या आवारात फोटोसेशनसह सेल्फीचाही आनंद घेतला. दर्शनासाठी गर्दी वाढल्याने देवस्थानच्या उत्पन्नातही मोठ्या प्रामाणात वाढ होण्याची शक्यता विश्‍वस्तांनी व्यक्त केली.

‘ते’ ठिकाण जतन करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १२ जानेवारीला युवा महोत्सवासाठी नाशिकला आले असता त्यांनी श्री काळाराम मंदिरास भेट देत महाआरतीही केली. या वेळी पंतप्रधानांनी मंदिराच्या आवारात साफसफाईही केली होती. पंतप्रधानांनी ज्या ठिकाणची स्वच्छता केली व भेटी दिल्या ती ठिकाणे जतन करण्याचा संकल्प विश्‍वस्त मंदार जानोरकर यांनी व्यक्त केला.

Ayodhya Ram Mandir : काळाराम संस्थानच्या ‘आनंद उत्सवा’स सामुहिक ढोल प्रदक्षिणेने प्रारंभ
Ayodhya Ram Mandir : देशभरातील संत, महंतांचा जमलाय ‘कुंभमेळा’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com